मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरारसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.
तर दुसरीकडे तिसरी लाट रोखण्यासाठी जास्त प्रमाणावर लसीकरण गरज असल्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावरचं नागरिक तुफान गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र लस तुटवड्यामुळे अनेक केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी हाणामारी केली जात आहे . तर काही लसीकरणं केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी गर्दी केली जात आहे.
असेच काहीसे मुंबईतील नेहमी गजबजलेला असणारा धारावी (Dharavi) परिसरात आज लसीकरणासाठी नागरिकांनी जीवघेणी गर्दी केली. या लसीकरण केंद्रावर नागरिकांकडून तुफान गर्दी करण्यात आली लसी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तोंडाला मास्कही लावले नाही. या गर्दीचा व्हिडियो सध्या सोधलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, करोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेतील बहुतांश रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.