Home महाराष्ट्र कोकण कोकण वासियांकरिता कोकण पुत्र नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर भडकले

कोकण वासियांकरिता कोकण पुत्र नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर भडकले

0

चिपळूण (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

नवे केंद्रीय मंत्री कोकण पुत्र नारायण राणे आज चिपळूणातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले कि एकही अधिकारी केंद्रीयमंत्रांसोबत पाहणी करण्यासाठी नव्हता त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावेळी त्यांच्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर भडकले. (Narayan Rane, son of Konkan, while talking to the District Collector, got angry with the Chief Minister)

राणे यांच्याशी बोलताना जिल्हाधिकारी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या संबंधात माहिती सांगत होते. त्यावेळी राणे त्यांना म्हणाले की, ते सीएम बीएम वगैरे मला काही सांगू नका..

आमच्या दौऱ्याच्यावेळी कोणताच सरकारी अधिकारी येथे उपस्थित नसल्याने त्यांनी हे संतप्त उद्‌गार काढले. आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिले आता तुम्हाला जागेवर बसू देणार नाही असे शब्दही राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वापरले. मी चिपळूणच्या बाजारपेठेत उभा आहे मला सरकारचा एकही अधिकारी भेटलेला नाही, असेही राणे यांनी त्यांना खडसावले.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या समवेत होते. केंद्रीय मंत्री, विरोधीपक्ष नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या समवेत जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी कुणीही उपस्थित का नाही, असा सवाल राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here