[ad_1]
हायलाइट्स:
- पुण्याच्या विविध प्रश्नावर मंत्रालयात झाली बैठक
- महापौरांच्या आमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप
- राष्ट्रवादी काँग्रेसनं आमंत्रण दिल्याचं पत्रच खुलं केलं!
राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोहोळ यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हा भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचा गुण माननीय महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अंगी पुरेपूर भिनलेला दिसतोय. पुणेकरांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार व विरोधी पक्षनेत्यांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस पुण्याच्या महापौरांसह महापालिका आयुक्तांनाही खुद्द उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून निमंत्रण देण्यात आलेले आहे. पुण्याच्या महापौरांचा बहुमोल वेळ वाया जाऊ नये म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीत सामील होण्याचे निमंत्रण असताना ‘मला निमंत्रण नाही’ म्हणत लग्नातील वरमाई प्रमाणे रुसून बसण्याचा प्रकार महापौरांनी बंद करावा. राजकारण करण्यासाठी इतर अनेक विषय तुमच्याकडे आहेत, त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळही आहे. कृपया पुणेकरांच्या हितासाठी आपल्या कांगावखोर स्वभावास आवर घालावा,’ अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनीही या संदर्भात भूमिका मांडली आहे. ‘उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून महापौरांना रीतसर निमंत्रण दिलं होतं. आमचे सहकारी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वत: फोन केला होता. मात्र, महापौरांच्या घरी दुःखद घटना घडल्यानं ते व्हिसीमध्ये सुद्धा उपस्थित राहू शकत नाही, असं त्यांनी आमच्या आमदारांना सांगितलं. आता हे बोलून सुद्धा त्यांनी हे ट्विट का केलं याबाबत मला काही सांगता येणार नाही, असं तुपे म्हणाले.
काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?
‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. करोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही. उलट मी करोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेवून पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करून न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत,’ असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा:
शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा अनिल देशमुखांबाबत की…
करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर
[ad_2]
Source link