Home महाराष्ट्र ‘संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’

‘संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’

0
‘संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’

मुंबईः (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र चोरून राज्यपालांना देणे हे नैतिक की अनैतिक, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप- प्रत्यारोप रंगले आहेत. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रलटवार केला आहे.

आमदारांच्या सहीचे पत्र पवारांच्या ड्रॉवरमधून चोरताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण नेते होते?, असा सवाल शिवसेनेनं केला होता. त्यावर निलेश राणेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे.

वाचाः पुण्यातून आनंदाची बातमी! कोविड रुग्णांमध्ये विक्रमी घट, 50 दिवसांत 53 हजार रुग्ण कोरोनामुक्त

‘संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही,’ अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटमधून केली आहे.

वाचाः आता आपल्या आई-बापांसाठी रग दाखवा, दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप

शिवसेनेची टीका

५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजपच्या नेत्यांनी स्वीकारणे, त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील ठरते, अशी टीका शिवसेनेनं केली होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here