Home महाराष्ट्र काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; ओबीसी आरक्षणावरून भाजपचा निशाणा

काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; ओबीसी आरक्षणावरून भाजपचा निशाणा

0

मुंबई: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून (OBC Reservation) सत्ताधारी पक्षांचे नेत आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण आता तापू लागले आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातील नेते केंद्र सरकारडे बोट दाखवत आहेत, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जबाबदार धरत आहे. केंद्र सरकारच डेटा उपलब्ध करत नसल्याचा सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसचा (Congress) केंद्रावर आरोप आहे. तर भाजपने (BJP) मात्र ओबीसी आरक्षणाचा विषयच काँग्रेसला समजला नसल्याचे म्हटले आहे. भाजपने यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दोन भाषणे ऐकण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे दोन फायदे होतील, असे भाजपने म्हटले आहे. (obc reservation bjp criticizes congress leaders)

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या लिंक दिल्या आहेत. ही भाषणे ऐकल्यास दोन फायदे होणार असून एक तर डोक्यात प्रकाश पडेल आणि दुसरे म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सोडवणे सोपे होईल, असा टोला उपाध्ये यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप रस्त्यावरची लढाई लढत आहे. तर, महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवत उपाध्ये यांनी फडणवीस यांचे भाषण ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

उपाध्ये आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार केंद्राकडे बोट दाखवतात, तर प्रवक्ते सचिन सावंत हे काही पत्रांकडे बोट दाखवतात. अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली.’

पुढच्याच ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, ‘पण, २०१३ साली त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील.’

इतके सांगूनही जर हा विषय समजला नसेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी खाली दिलेल्या दोन लिंक ऐकाव्या. त्यांने दोन फायदे होतील असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘ …आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील.

१. डोक्यात प्रकाश पडेल
२. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here