Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र Pachora Dhangar Samaj : पाचोरा तालुका सकल धनगर समाजाकडुन श्रीक्षेत्र चौंडी येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा

Pachora Dhangar Samaj : पाचोरा तालुका सकल धनगर समाजाकडुन श्रीक्षेत्र चौंडी येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा

0
Pachora Dhangar Samaj : पाचोरा तालुका सकल धनगर समाजाकडुन श्रीक्षेत्र चौंडी येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा

पाचोरा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

पाचोरा तालुका सकल धनगर समाजाकडुन सोलापुर येथे समाज बांधवांना झालेल्या अमानुष मारहानीच्या घटनेचा जाहीर निषेध तसेच श्रीक्षेत्र चौंडी येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला जाहीर देण्यात आला.

याबाबत आज पाचोरा येथे ऊप विभागीय (प्रांत) अधिकारी साहेब आणि पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले.

   
सदर निवेदनात धनगर समाजाला अनुसुचित जमातीची (एस.टी.) सवलत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, सोलापुर येथे समाज बांधवांना अमानुष मारहाण करणार्या मंत्री विखे पाटील यांच्या अंगरक्षक आणि गावगुंडांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येऊन अंगरक्षकांना तातडीने निलंबित करण्यात यावे, मंत्री विखे पाटील यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, श्रीक्षेत्र चौंडी येथील समाज बांधवाच्या आमरण उपोषणाचा तातडीने मार्ग काढण्यात यावा ई.मागण्याचे निवेदन देण्यात आले.

    
यावेळी संजय परदेशी, किशोर पेंढारकर, विलास पाटील, प्रा.अतुल सुर्यवंशी सर,विशाल हाटकर,सुनिल निळे,नाना धनगर, नामदेव धनगर ई.सह पाचोरा शहर आणि तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here