[ad_1]
हायलाइट्स:
- धबधब्याच्या डोहात बूडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू.
- पनवेलमधील वाजे येथील कुंडी धबधब्यावरील दुर्घटना.
- सलमान खानच्या फार्महाऊस जवळ आहे धबधबा.
वाचा: मुंबई: धारावीत आज करोनाचा एकही नवा रुग्ण नाही; ‘असा’ दिला लढा
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कुंडी धबधबा येथे मुंबई येथील शिवडी परिसरातील ६ मित्र फिरण्यासाठी आले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास मौसिन मुघल ( वय १९ वर्षे ) व त्याचा मित्र सिद्धेश संजय माने (वय १९ वर्ष) हे दोघे पाय घसरून पाण्यात पडले. यातील सिद्धेश हा एका मुलाचा पाय पकडून वर आला परंतु, मौसिन हा कुंडी धबधब्याच्या खोल डोहात बुडाला. स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने मौसिन याला बाहेर काढून पनवेल जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मौसिन याचे वडील परदेशात कामाला असून तो एकुलता एक मुलगा होता. कॉलेजसंबंधी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता.
वाचा: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान
कुंडी धबधब्यात आतापर्यंत ११ जणांचा बुडून मृत्यू झाला असून हे सर्व जण त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, मौसिन याच्या मृत्यूने या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पर्यटकांना मनाई असतानाही…
कोविड निर्बंधांमुळे सध्या पर्यटनावरही बंधने घालण्यात आलेली आहेत. त्यात अनेक पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेली आहेत. पनवेलमध्येही धबधबे, धरणे व अन्य पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. मात्र पोलिसांची नजर चुकवून काही पर्यटक अशा ठिकाणांवर पोहचत असून त्यातून दुर्घटनांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे.
वाचा:ठाकरे सरकारची प्रसिद्धीत आघाडी!; १६ महिन्यांत तब्बल १५५ कोटी खर्च
[ad_2]
Source link