यवतमाळ : विविध उपचार करूनही मृत्युशिवाय पर्याय दिसत नसलेल्या व ब्रेन हॅमरेज झालेल्या रुग्णाला होमिओपॅथी डॉक्टर विनायक राठोड यांनी उपचार करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले. कळंब तालुक्यातील कात्री येथील रहिवासी श्री.जीवन मुळे (वय ४९) असे जीवनदान मिळालेल्या रुग्णाचे नाव आहे.
मुळे यांना ११ डिसेंबर रोजी अचानक डोकेदुखी व उजव्या हातात कमजोरी जाणवायला लागली होती. उपचार घेण्यासाठी ते नामांकीत डॉक्टरांकडे दाखल झाले. तिथे त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. सिटीस्कॅन, एम.आर.आय. रिपोर्टस्मध्ये ब्रेन हॅमरेज झाल्याचे आढळून आले. या रिपोर्टनंतर त्यांना शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असल्याचा सल्ला येथील न्युरोसर्जनने दिला.
शस्त्रक्रीयेदरम्यान जीव वाचण्याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. यामुळे मुळे यांना मोठा धक्का बसला. ते खूप नाराज झाले होते. पण यातच त्यांना डॉ. विनायक राठोड यांचा सल्ला घेण्यासाठी सुचवण्यात आलं. मुळे डॉ. विनायक राठोड यांच्या तुळजाई होमिओपॅथी सीमध्ये उपचाराचा निर्णय घेतला. १३ डिसेंबर २०१९ ला डॉ.विनायक राठोड यांच्या कक्षात आणण्यात आले.
तेव्हा त्यांचा शरिरावरील नियंत्रण सुटले होते, त्यांना ऐकू येत नव्हते. त्यांची उजवी बाजूसुद्धा कमजोर झाली होती. डॉ. राठोड यांनी त्यांच्या शरीराची संपुर्ण चाचणी करून सर्व रिपोर्टचा अभ्यास केला. त्यांची सविस्तर हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू केला. अवघ्या तीन दिवसानंतर मुळे परत आले असता त्यांच्यात पूर्वीपेक्षा आराम दिसून आला. त्यांच्यात उत्साह दिसत होता.
१३ जानेवारी २०२० ला पुन्हा सिटीस्कॅन केला असता मेंदूतील रक्ताचा गोळा कमी झाला होता. यानंतर पुन्हा औषधोपचार करून २० फेब्रुवारी २०२० ला सिटीस्कॅन केला असता त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला. हे पाहून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.