Home देश-विदेश पेट्रोल आणि डिझेल च्या दाराचा भडका; जाणून घ्या आपल्या शहरातील दरवाढ

पेट्रोल आणि डिझेल च्या दाराचा भडका; जाणून घ्या आपल्या शहरातील दरवाढ

0
पेट्रोल आणि डिझेल च्या दाराचा भडका; जाणून घ्या आपल्या शहरातील दरवाढ

नवी दिल्ली : देशात इंधनदरवाढीचं सत्र सुरुच असून आज पुन्हा एकदा इंधनदर कडाडल्याचं पाहायला मिळालं आहे. आज पेट्रोलचे दर 29 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 17 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.66 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 87.41 रुपये झाली आहे.

मुंबईत पेट्रोल 101.04 रुपये प्रति लिटर 

देशाच्या आर्थिक राजधानीहीतही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोलनं दरवाढीत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि लडाखसह सहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तसेच मुंबईत सध्या पेट्रोलचे दर 102.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.84 प्रति लिटर झालं आहे. देशात राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक वॅट लावण्यात येतो. त्यानंतर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा क्रमांक येतो.

महाराष्ट्रात मुंबईसह परभणीतही पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळालं. आज परभणी पेट्रोल 24 पैशांनी महागलं तर डिझेल 14 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे परभणीत पेट्रोलचे दर 105 रुपये 18 पैशांवर तर डिझेल गेले 95 रुपये 66 पैशांवर पोहोचलं आहे. यंदाच्या वर्षात चार मेनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये 24व्या वेळा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान पेट्रोलच्या दरात 5.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 6.63 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे.

महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here