Home महाराष्ट्र Prashant Kishor Meets Sharad Pawar – शरद पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर भाजप सावध; राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी | Maharashtra Times

Prashant Kishor Meets Sharad Pawar – शरद पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर भाजप सावध; राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी | Maharashtra Times

0
Prashant Kishor Meets Sharad Pawar – शरद पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर भाजप सावध; राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी | Maharashtra Times

[ad_1]

हायलाइट्स:

  • शरद पवार-प्रशांत किशोर भेटीनंतर भाजप सावध
  • राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घोंगडी बैठकांचं आयोजन
  • महाविकास आघाडीच्या कारभाराचा पंचनामा करणार

सोलापूर: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची तीन तास चर्चा झाल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधाची धार तीव्र केलीय. त्याची सुरुवात आज पंढरपुरात करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे आज पंढरपुरातील नामदेव पायरीपासून आपल्या घोंगडी बैठकांना सुरुवात करणार आहेत.

वाचा: रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची बेकायदा झडती; सहा पोलीस निलंबित

पडळकर हे पंढरपुरातील मठात जाऊन दहा वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहेत. या घोंगडी बैठकांतून सत्ताधारी पक्षांच्या प्रति असणारी लोकभावना जाणून घेण्याचाही प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे. त्यासाठी ‘साद बहुजनांच्या हक्कासाठी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मराठा मतांवर पकड असणाऱ्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी ओबीसींची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एका अर्थाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावायला भाजप आता सरसावली आहे. कारण किशोर आणि पवार भेटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे डोळे विस्फारले आहेत. भाजपने संपूर्ण ताकद लावल्यानंतरही पश्चिम बंगालच्या निवडणुकांत ममता बॅनर्जी या सत्तास्थानी पोहचल्या. त्यांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणाऱ्या किशोर यांच्याशी झालेेली बैठक भाजपला केंद्रीय राजकारणात सूचक संकेत देणारी ठरली आहे.
त्याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत अनपेक्षित जुगाड करणाऱ्या शरद पवार यांच्यावर भाजपने बारीक नजर ठेवायला सुरुवात केली आहे. लवकरच म्हणजे २०२२ ला गुजरात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला राज्यातच गुंतवून ठेवण्यासाठी भाजपने आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर आपलं लक्ष्य केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक उतरंडीत जातीचे कार्ड म्हणून उपयोगाला येणाऱ्या नेत्यांना मैदानात उतरविण्यात येणार आहे.

वाचा: मराठा आंदोलन राजकारण्यांच्या ताब्यात, पुढं काय होणार?

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here