Home महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार

1
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार

मुंबई, दि. 5 जुलै (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर सपशेल खोटे आरोप लावून असे निलंबन करणे, हे निषेधार्थ आहे. (protest-against-the-maha-vikas-aaghadi-government-for-suspending-12-bjp-mlas-who-raised-their-voices-in-the-assembly-regarding-obc-reservation-ex-mla-narendra-pawar)

खरेतर कामकाजावेळी तालिका सभापती, शिवसेना नेते भाष्कर जाधव यांना भाजप आमदारांकडून कोणतीही शिवीगाळ करण्यात आलेली नाही. भाजपच्या आमदारांनी उपाध्यक्षांच्या दालनात कोणतेही अपशब्द वापरलेले नाही, गैरप्रकार झाला असेल तर त्याचे CCTV फुटेज जाहीर करा दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.

हेही वाचा : राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या

ओबीसी आणि मराठा आरक्षणावर मविआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याने विरोधक वरचढ होतांना पाहून, विरोधकांची संख्या कमी करून नेमक्यावेळी आपल्यावर होणारी टीकेची झोड कमी करण्यासाठी आणि भाजपच्या आक्रमकतेच्या भितीपोटी आज हे निंदनीय निर्णय घेतल्या गेले आहे. या निर्णयाचा आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी तर्फे जाहीर निषेध करतो.

हेही वाचा : ‘१२ जणांचं निलंबन केलं पण आघाडी सरकारचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

असे प्रतिपादन भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक मा. आमदार नरेंद्र पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना केले. तसेच, राज्यातील जनतेचे सुड घेण्यासाठी सत्तेवर आलेल्या आणि नाकर्तेपणाचे कळस गाठलेल्या या महाभकास तिघाडी सरकारकडून असले रडीचे डाव होणे सहाजिक आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला.

हेही वाचा : फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर उद्यापासून मविआ सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात येथील अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी दिली

हेही वाचा : भाजप आमदाराचं निलंबन; फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

हेही वाचा : शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार?

आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here