पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सारसबाग येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पाचे अज्ञात विघातक वृत्तीच्या लोकांनी नुकसान केलेले आहे याचा निषेध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
समाजाच्या वतीने दर रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन व पूजन करण्यात येत ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता असे निदर्शनास आले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकातील ऐतिहासिक शिल्पंमधील अहील्यादेवी यांचे दोन्ही हात तुटलेले व खाली पडलेले आहेत याची तातडीने समाज बांधवांनी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे तक्रार देऊन तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याच बरोबर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे पुढील तपास स्वारगेट पोलिस स्टेशन च्या वतीने करण्यात येत आहे