Home पुणे पुणे आग दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत

पुणे आग दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत

0
पुणे आग दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत

पुणे : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पुण्यातील मुळशी तालुक्यात एका रासायनिक कंपनीला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास १८ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसंच यामध्ये काही जण जखमीही झाले. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदतीची घोषणा केली आहे.

‘महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून’ २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५० हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे,’ अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. काही क्षणात ही आग सर्वत्र पसरली आणि कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. कंपनीत काम करत असलेल्या १८ कामगारांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, तर काही कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत.

मदतीची घोषणा करताना अजित पवार काय म्हणाले?

‘पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here