Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुण्यात पुन्हा ‘विकेंड लॉकडाऊन’; अजितदादांनी पुणेकरांना दिला ‘हा’ इशारा

पुण्यात पुन्हा ‘विकेंड लॉकडाऊन’; अजितदादांनी पुणेकरांना दिला ‘हा’ इशारा

0
पुण्यात पुन्हा ‘विकेंड लॉकडाऊन’; अजितदादांनी पुणेकरांना दिला ‘हा’ इशारा

पुणेः शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात पुन्हा गर्दी वाढू लागल्यानं शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, विनाकारण जिल्हाबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही विकेंडला विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांमुळं पुन्हा करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुण्यात पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘करोनाचे संकट कमी होत असलं तरी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोमवारी ते शुक्रवार नियमांप्रमाणे दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘लोणावळा, महाबळेश्वर या पर्यटकांच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. जे पुण्याबाहेर लोक गेले आहेत ते परत आल्यानंतर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल,’ असा सज्जड दमच अजितदादांनी पुणेकरांना दिला आहे.

‘अमेरिका, इंग्लंड येथे लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईनये तिसरी लाट येऊ पाहत आहे. आपल्याकडे अजूनही लसीकरण पूर्ण झालं नाहीये. आपण नीट काळजी घेतली पाहिजे,’ असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here