Ahilyadevi Holkar Mahila Sanman Puraskar ; महाराष्ट्रातील  ग्रामपंचायतींमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान होणार; राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय

0
203

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

सांस्कृतिक भारताच्या जीर्णोद्धार कर्त्या, अठराव्या शतकातील अद्वितीय महिला राज्यकर्त्या, मानवतावादी लोकशाही मूल्यांची पायाभरणी करणाऱ्या , राष्ट्रीय एकात्मतेच्या पुरस्करत्या ,सर्वांना समान न्यायाची प्रेरणा देणाऱ्या,प्रसंग येता दुर्गामातेची प्रतिकृती भासणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आदर्श निर्णय घेतला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच ३१ मे ला राज्यातील २८००३ ग्रामपंचायतीमध्ये दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्याचे आदेश राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काढले.

दोन कर्तृत्ववान महिलांना महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट/उल्लेखनीय कार्य ३ वर्षांपेक्षा जास्त काळ करीत असलेल्या महिला यासाठी पात्र राहतील बाल विवाह प्रतिबंध,हुंडा निर्मूलन,लिंग चिकित्सा प्रतिबंध,घरगुती हिंसा प्रतिबंध,महिला सक्षमकरण,महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य साक्षरता,मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्त पुढाकार घेतलेला असावा.

अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार पात्रता निकष

 1. महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गावातील 2 महिला.
 2. सदर महिला त्याच ग्रामपंचायत मधील रहिवासी असणे गरजेचे आहे.
 3. महिलेने कार्य हे ग्रामपंचायत मध्ये गेलेले असावे.
 4. महिला व बालविकास क्षेत्रात किमान 3 वर्ष महिलेने कार्य केलेले असावे.
 5. पुरस्कार प्राप्त महिला या 7 वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा प्राप्त ठरणार आहेत.
 6. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव संवेदनशिलता असणे गरजेचे आहे.
 7. सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.
 8. पुरस्कारासाठी पात्र असलेली महिला अत्याचारांमध्ये समाविष्ट नसली पाहिजे.
 9. बाल विवाह प्रतिबंध , हुंडा निर्मूलन , लिंग चिकित्सा प्रतिबंध , घरगुती हिंसा प्रतिबंध , महिला सक्षमीकरण , महिला स्वयंसहाय्यता बचत गट , आरोग्य , साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतलेली महिला असणे बंधनकारक आहे.

महिलेची निवड करण्याची कार्यपद्धत

ज्या महिला या पुरस्कारासाठी इच्छुक आहेत अशा सर्व महिलांनी आपल्या वैयक्तिक माहितीचा तपशील आपल्या गावातील ग्रामपंचायतकडे सादर करणे आवश्यक आहे व अर्ज करणे देखील आवश्यक आहे.

यंत्रणा

 • जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.
 • तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्याची दक्षता घ्यावी.
 • ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक , पोलीस पाटील , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक , अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठित करण्यात यावी. ज्या ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल अशा ठिकाणी प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी.
 • सन्मान पत्राचा विहित नमुना आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शासनाच्या मान्यतेने निश्चित करून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतला उपलब्ध करून घ्यावा त्या पुढील कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी.
सदर पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत 2000 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च जिल्हा परिषद मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समितीने राबवयाच्या योजनांबाबत ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय अन्वय महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समिती यांना उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10% निधीमधून करावा


       

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार शासकीय शासन निर्णय बघा


इच्छुक महिलेने स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

धनगर समाजाचे सन्माननीय मार्गदर्शक नेते पद्मश्री मा खासदार डॉ विकास महात्मे ,  माजी मंत्री प्रा.राम शिंदे,मा मंत्री महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, मा मंत्री दत्ता भरणे, मा आमदार प्रकाश शेंडगे, डॉ.उज्वला हाके, विवेक बिडगर, डॉ. राम पडळकर, रामेश्वर पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

पुण्यातील धनगर समाज बांधव रोहित पांढरे, संतोष वाघमोडे, विकास माने, प्रमोद परदेशी, सोमनाथ देवकाते, श्रीकांत वाघमोडे, राहुल मदने, दत्तात्रय बंडगर, संदीप कुरूवर, सुरेश धनगर, उमेश धनगर, महादेव वाघमोडे, नथू बावधन, संतोष बावधने, मनोज मारकड, दीपक भोजने, धनंजय ताणले, विजय गोफने, तुकाराम शेंडगे, निलेश मसाळ, भिम देवकाते, यशवंत परदेशी, प्रदीप परदेशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले.