Home महाराष्ट्र राज कुंद्राचे उत्तर प्रदेशपर्यंत धागेदोरे; कानपूरमधील महिलेचे बॅंक खाते सील

राज कुंद्राचे उत्तर प्रदेशपर्यंत धागेदोरे; कानपूरमधील महिलेचे बॅंक खाते सील

0

मुंबई – अश्‍लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचसमोर दररोज नवनवीन खुलासे येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशच्या कानपूरशी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कानपूरच्या एका महिलेचे देखील बॅंक खाते सील करण्यात आले आहे.

या महिलेच्या बॅंक खात्यात अश्‍लील चित्रपट निर्मितीच्या उत्पन्नाचे कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. संबंधित बॅंक खाते हे हर्षिता श्रीवास्तव नावाच्या महिलेचे आहे. हे बॅंक खातं जेव्हा सील करण्यात आले तेव्हा त्या खात्यात 2 कोटी 32 लाख 45 हजार 222 रुपये होते.

मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्‌सच्या व्हाट्‌सऍप ग्रुपमध्ये अरविंद कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. या अरविंदच्या पत्नीचे नाव हर्षिता असे आहे.

अरविंद हा फक्त त्याच्या पत्नीच्याच नव्हे तर त्याचे पिता नर्वदा श्रीवास्तव यांच्याही बॅंक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा. अरविंद ऍपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबियांच्या बॅंक खात्यात का ट्रान्सफर करायचा, याबाबत सध्या तपास सुरु आहे.

संबंधित बॅंक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा ब्लॅकमनीचा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बॅंक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे.

संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर आता अरविंदचं बॅंक अकाउंटदेखील सील करण्यात आले आहे. या खात्यात तब्बल 1.81 कोटी रुपये होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here