धुळे – रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताच्या घटना घडतात. वाहनधारकांना याचा मोठा फटका बसतो. मात्र, धुळ्यातील संतोषीमाता चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांसोबत वाहतूक पोलिसांनाही फटका बसल्याचे चित्र आहे. खड्यांमुळे कांद्याने भरलेल्या पिकअपचा टायर फुटला आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी पिकअपमधील गोण्या बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे शहरातील संतोषीमाता […]