
सोलापूर : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. यामुळे सोलापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. खरंतर, 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढणार अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून केली होती.
मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे सोलापूरमध्ये सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची भव्य तयारी सुरू करण्यात आली असून जर यामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार असतील तर याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतरही कोणताही तोडगा न निघाल्यामुळे खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला जाईल अशी घोषणा संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरून केली होती. या पार्श्वभूमीवर जर या मोर्चाला उदयनराजे भोसले यांनी साथ दिली तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मोर्चासाठी उपस्थित होईल, असं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोदींची भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी विनंती केली होती. त्यानंतर उद्याची ही भेट महत्त्वाची असणार आहे.
[…] मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयन… […]
[…] मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयन… […]