
बीड – अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गावात दोन वर्षापासून गावचा सरपंच गैरहजर असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट सरंपचाच्या खुर्चीवर कुत्रा बसवून ग्रामस्थांनी निषेध केला आहे. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात यावे यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन दिली मात्र कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी अशाप्रकारे निषेध व्यक्त केला आहे. परिसरात या आगळ्यावेगळ्या निषेधाची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
मोरेवाडी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात येथील महिला सरपंच मागील काही वर्षापासून फक्त झेंडावंदन व सार्वजनिक उत्सवासाठीच ग्राम पंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामकाज त्या घरात बसूनच Work From Home करत आहेत.
सरपंचांनी मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्यास कायदेशीर सांगण्यात यावे. अन्यथा वेगवेगळ्या आंदोलन आणि ग्राम पंचायतचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
[ad_2]