Home महाराष्ट्र Maharashtra Politics BJP : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी भाजपासोबत असले तरी महाराष्ट्रात भाजप बॉस राहिला पाहिजे….

Maharashtra Politics BJP : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी भाजपासोबत असले तरी महाराष्ट्रात भाजप बॉस राहिला पाहिजे….

0
Maharashtra Politics BJP : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी भाजपासोबत असले तरी महाराष्ट्रात भाजप बॉस राहिला पाहिजे….

मुंबई | शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी राज्यात भाजप कायमच बॉस राहिला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईतील दादर येथे भाजपच्या विस्तार बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपने राज्यात आणि केंद्रात इतर पक्षांसोबत युती करण्याचा आग्रह धरला असला तरी या युतीची सूत्रे आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बैठका सुरू केल्या आहेत. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन सुरू आहे. दादर येथील पक्ष कार्यालयात भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यात सहभागी झाला असला तरी राज्यात भाजप नेहमीच बॉस आहे, हे कायम लक्षात ठेवावे. महायुतीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांशी समन्वय साधून उमेदवार निवडणे ही आपली जबाबदारी असल्याचेही फडणवीस म्हणाले. पहिली पार्टी आणि मी शेवटची. पक्षामुळे मी येथे उभा आहे. मी पक्ष सोडून उभा राहिलो तर माझे डिपॉझिटही जप्त होईल, असेही फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विस्तारकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करण्याचे आणि पक्षाची भूमिका, कार्य पोहचवण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here