भडगाव, १३ जून (जळगाव जिल्हा) । शासननामा न्यूज ऑनलाईन
७ जून रोजी शिवसेना पक्ष (Shivsena Pachora, Bhadgaon) कडून पाचोरा व भडगाव तालुक्यात महावितरण कंपनीच्या विरोधात ‘ताला ठोक’ आंदोलन करण्यात आले. पाचोरा व भडगांव तालुक्यातील सर्व वीजवितरण कंपनीच्या कार्यालयांवर झालेल्या या आंदोलनात जाणीवपूर्वक भडगावला बदनाम करण्यात आले. पाचोरा तालुख्यातील तथा कथित गाव गुंडांच्या राजकारणामुळे भडगावच्या पावन भूमीत येऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयावर अचानक हल्ला केला. तेथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कॅबिनची मोडतोड केली. “इंजिनीयर अजय धामोरे कुठे (धनगर समाजाचे) आहे” (Where is Engineer Ajay Dhamore (of Dhangar Samaj)?) यांचा नामोल्लेख करून त्यांचा शोध घेतला, व नेमका त्यांच्यावरच पूर्वनियोजित हल्ला केला या हल्ल्यात वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन गजानन राणे यांचा जागीच मृत्यू झाला.
क्लिक करा आणि वाचा : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी दावा करणार? संजय राऊतांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात भडगाव चे नाव बदनाम झाले. खरंतर बारा बलुतेदार समाजाची आदर्श सामाजिक सहिष्णुता जोपासणारा भडगावची समाज रचना आहे . येथील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या वाचा व कृतीत कधीही एवढे भयानक प्रकार घडुच शकत नाही. एखाद्या शासकीय कार्यालयात घुसून कर्मचार्याचा जीव घेण्यापर्यंतची गुन्हेगारी प्रवृत्ती भडगावच्या भूमीत कधीही घडलेली नाही.
श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या (Shri chakradhar swami) पदस्पर्शाने पावन झालेले भडगाव घटनेने कलंकित व बदनाम झाले. भडगाव तालुक्याच्या गावागावात विविध समाज व सामाजिक परंपरेला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. परमेश्वरावर निष्ठा ठेवून कष्ट करणारा भडगावचा सर्वधर्म समभाव असा समाज आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार यांच्यापासून चार हात लांब राहणारा सर्व धर्मीय समाज आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यावर राग असला तरी त्यांच्यावर हल्ला करून जिवे मारणे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव जाईपर्यंत मारणे ही भडगावच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही. तरीसुद्धा ७ जून च्या घटनेत झालेला कर्मचार्याचा मृत्यू आणि MSEB इंजिनीयरला झालेली मारहाण संपूर्ण भडगाव तालुक्याला अचंबित करणारी होती. गावात प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघत होता. “भडगाव तालुक्यातील प्रत्येक घरातील गावातील ही मुले निश्चित नाहीत ” हा भडगाव वासीयांचा ठाम विश्वास होता आणि घडलेही तसेच .. कारण भडगाव येथे येऊन MSEB कार्यालयावर भ्याड हल्ला करून कर्मचाऱ्याला मारणारी भ्याड हल्ला करणारे भडगावच्या पवित्र मातीतली नसून शेजारच्या पाचोरा तालुक्यातून असल्याचे निष्पन्न झाले.
क्लिक करा आणि वाचा : जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन
कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक जळगाव व सबंधिंत पोलिसांनी त्यांचा अखेर पर्दापाश केला आहे आणि अटक ही पारदर्शक पणे केली आहे. कोणत्याही सत्ताधारी राजकीय पक्षाचे दबावाला बळी ही पडले नाही विशेष म्हणजे येथील विद्यमान आमदार यांच्या जवळचे असलेले शिवसैनिच या घटनेत सहभागी होते. आमदाराचे जवळचे नातेवाईक सुद्धा यात आरोपी आहेत. पद , पैसा, ठेके घेऊन गुन्हा करणारे कार्यकर्ता या घटनेत सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व आरोपी पाचोरा येथील शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी असल्याचे आता समोर आले आहे. मात्र आमदारांच्या विश्वासातील , शिवसेनेचा झेंडा घेऊन गुन्हा करणाऱ्या या सैनिकांनी भडगावला येऊन संस्कृती बदनाम केल्याचे दुःख प्रत्येक भडगाव वासियाला आहे. यापूर्वी भडगाव पारोळा मतदार संघ होता, त्यानंतर भडगाव पाचोरा मतदार संघ झाला. यापूर्वी भडगाव पाचोरा सोबत काम करीत असताना कोणत्याही आमदारांच्या काळात सत्ता असतांना आंदोलन करून कुणाचा जिव जाईल असे कृत्य झालेले नाही. मग शिवसेना कार्यकर्त्यांना करायला का भाग पाडले ? हे रहस्य मात्र गुलदस्त्यातच आहे. मात्र ही चुकीचे परंपरा भडगाव पाचोरा मतदार संघात सुरू केली आहे. असे राजकीय विरोधक खुले आम पणे निवेदन देऊन प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. भडगावचाच नव्हे तर पाचोऱ्याचा सुद्धा सभ्य, सुसंस्कृत, सद्सद्विवेक बुद्धी असलेला सहिष्णू सर्व धर्मीय समाज अशा राजकीय नेत्यांना स्वीकारणार नाही.असे राजकीय गोट्यात चर्चीले जात आहे
क्लिक करा आणि वाचा : वारीसाठी परवानगी द्या, अन्यथा…; वारकरी संघटनेनं ठाकरे सरकारला दिला इशारा
भडगावकर जनतेची बदनामी करणाऱ्या त्याच्या शिवसेना पक्षाचा आणि त्याच्या भ्याड हल्ल्याचा भाजपा पक्षाचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव व पाचोरा राजकीय पक्षाचे पदाधिकारी सैरा वैरा आरोप प्रत्यारोप करीत आहेत. सदर घटनेत अजय धामोरे यांची फिर्याद वरून भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.नं.133/2021 भादवी कलम 307, 304, 353,332,143,147,148,149, 294, 323, 504, 506, 427 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हानी प्रतिबंध अधिनियम 1948 चे कलम 3 प्रमाणे दि.7/6/2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यानुसार दरम्यान भडगाव पोलिस स्टेशनचे अधिनस्त अधिकारी / अमंलदार पोउपनि सुशिल सोनवणे, पोना/लक्ष्मण अरूण पाटील, पो.ना./प्रल्हाद शिंदे, पो.ना./नातिन तुकाराम राऊते, पो.काॅ./स्वप्निल बाळासाहेब चव्हाण, पो.काॅ/ईश्वर पंडीत पाटील, यांनी वरीष्ठ अधिकारींचे मार्गदर्शनावर सदर सात आरोपी पैकी शोध घेवुन सहा संशयीतांना जितेंद्र विश्वासराव पेंढारकर (Jitendra Vishwasrao Pendharkar), अनिल बारकु पाटील (Anil Barku Patil), संदिप रामदास पाटील (Sandeep Ramdas Patil), सुमित रविंद्र सावंत (Sumit Ravindra Sawant), चरणसिंग प्रेमसिंग पाटील (Charansingh Premsingh patil), गणेश सुदाम चौधरी (Ganesh Sudham Chaudhari), यांना चिताफिने अटक करून दि.12/6/2021 रोजी भडगाव न्यायालयात हजर केले असता एक आरोपी फरार आहे. शासननामा न्यूजच्या माहिती नुसार वरील सर्व आरोपी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. लवकरच सर्व आरोपींचे पदासहित नाव जाहीर करण्यात येतील.
क्लिक करा आणि वाचा : शिवसेनेची डोकेदुखी वाढली; संजय राऊतांच्या बैठकीला ‘ते’ नगरसेवक गैरहजर
१५ जून पर्यंत सहा आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे अशी माहिती भडगाव पोलिसानी दिलीव लवकरच उर्वरीत आरोपींना अटक करण्यात येणार आहे. पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे, अपर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी केलास गावडे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाळे, यांच्या आदेश व मार्गदर्शनावर पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहे.
क्लिक करा आणि वाचा : ट्रोल करणाऱ्यांचा घेतला समाचार : मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर मांडते ; माझ्यावरील बंधने हटवा : करुणा मुंडे