Home महाराष्ट्र ‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’

‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’

0
‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’
मुंबईः (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 
‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले आहे. कारण भाजपविरोधकांनी या माध्यामांचे कोपरे बळकावून भाजपच्या खोट्यानाट्या प्रचारास उत्तर देणे सुरु केले. अरे ला कारे जोरात सुरु आहे व अनेक ठिकाणी ट्विटरच्या रणमैदानातून भाजपला, त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे आणि त्यांच्या ट्विटर सेनेचीही दाणादाण उडत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजप व मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरुन देशात सध्या वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयापर्यंत मोदी सरकार आले आहे,’ अशी टीका शिवसेनेनं मोदी सरकारवर केली आहे.

वाचाः महाराष्ट्र आजपासून अनलॉक, पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

‘उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांनी यथेच्छ बदनामी केली. त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले?, मनमोहन सिंगांसारख्या जेष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालवल्या नेत्यांच्या विरोधात या ट्विटरचा वापर करुन बदनामी मोहिमा राबवल्या गेल्या,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

वाचाः जिल्हा प्रशासनाचं डिजिटल पाऊल; पुण्यात महसुली खटल्यांची होणार ऑनलाईन सुनावणी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here