एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात समाजकार्य विभागातर्फे ‘सर्वत्र सुरक्षा अभियानाची’ सुरुवात

0
40

शासननामा | विशेष प्रतिनिधी

मा.संचालक, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाजकार्य विभाग, प्रा.डॉ.प्रभाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘सर्वत्र सुरक्षा अभियान’ सुरू करण्यात आले.

आझाद मैदान पोलीस स्टेशनचे निर्भया पथकातील अधिकारी तसेच लोहमार्ग पोलीस विभागच्या मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीम. स्मिता ढाकणे यांनी मार्गदर्शन केले.

आझाद मैदान पोलीस स्टेशनचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्रीम.सारिका निकम, मा.पोलीस उपनिरीक्षक, श्रीम.कमल कर्चे, श्रीम.स्नेहल पाटील, श्रीम.पुनम देवकत यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

स्व संरक्षण, सतर्कता, सायबर सुरक्षा, रेल्वे सुरक्षा त्या संदर्भातील हेल्प लाईन या विषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

सर्व्ह विथ श्रद्धा संस्थेच्या अध्यक्षा, श्रीम. श्रद्धा सिंग यांची विशेष उपस्थिती होती.

भविष्यात असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील असा मानस प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी व्यक्त केला.