पुणे, 09 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत’ असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं.
[…] …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार,… […]
[…] …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार,… […]