Home पुणे पुण्याची ‘सीरम’ आता ब्रिटीश लशीपाठोपाठ रशियन लस सुद्धा बनवणार? DCGI कडे मागितली परवानगी

पुण्याची ‘सीरम’ आता ब्रिटीश लशीपाठोपाठ रशियन लस सुद्धा बनवणार? DCGI कडे मागितली परवानगी

0
पुण्याची ‘सीरम’ आता ब्रिटीश लशीपाठोपाठ रशियन लस सुद्धा बनवणार? DCGI कडे मागितली परवानगी

नवी दिल्ली, 3 जून : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) येत्या काही दिवसातच भारतात रशियन स्पुटनिक लस (Sputnik-V) तयार करू शकते. या लसीच्या उत्पादनासाठी चाचण्यांच्या परवान्यासाठी सीरम संस्थेनं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागितली आहे. वृत्तसंस्था एएनआयनं आपल्या सूत्रांकडून ही माहिती दिली आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रोजेनका यांच्या सहकार्यानं कोविशिल्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटनं आता Sputnik-V चाचणी विश्लेषण आणि परीक्षणासाठी अर्ज केला आहे. स्पुटनिक-व्ही या लसीला देशात सध्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानं मान्यता दिली आहे. सध्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांमध्ये स्पुटनिकची निर्मिती केली जात आहे.

सरकारने 30 कोटी डोसचे आदेश दिले 

देशात आपात्कालीन वापरासाठी रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीची 12 एप्रिल रोजी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर 14 मे पासून या लसीचा वापर सुरू करण्यात आला. आरडीआयएफ आणि पॅनासिआ बायोटेक यांनी स्पुटनिक व्ही लसीचे वर्षाला 10 कोटी डोस बनवण्याविषयी सहमती दर्शवली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही लस वयस्कांमध्ये सुमारे  83 टक्के प्रभावी आहे.

एकाच डोसची रशियाची स्पुटनिक लाईट (Sputnik Light) कोविड लस वृद्ध लोकांमध्ये सुमारे 83 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. याबाबतची माहिती आणि आकडेवारी अर्जेंटिनामधून गोळा केली गेली आहे. ब्युनस आयर्स प्रांताच्या आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्पुटनिक लाइट वृद्धांमध्ये 78.6 ते 83.7 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आलं आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडकडून (आरडीआयएफ) याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19 विरोधी रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीची ही नवीन आवृत्ती आहे, या लसीला मे महिन्यातच मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी आरडीआयएफने स्पुटनिक व्हीच्या दोन डोसपेक्षा एक डोस असलेली लस अधिक चांगली असल्याचे म्हटले आहे.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here