Home महाराष्ट्र यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून; एसटीमध्ये २० प्रवासी; बचावकार्य सुरु

यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून; एसटीमध्ये २० प्रवासी; बचावकार्य सुरु

0
यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून; एसटीमध्ये २० प्रवासी; बचावकार्य सुरु

यवतमाळ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका कायम आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे  उमरखेड इथल्या दहागावजवळ एसटी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एसटीमध्ये चार ते सहा प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी उमरखेडवरून पुसदला जात होती. 

रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहागावच्या पुलावर पाणी आले होते. असे असतानाही एसटी ड्रायव्हरने नको ते धाडस करुन बस पाण्यातून रेटली आणि अपघाताची ही घटना घडली. सध्या स्थानिकांकडून बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी, कडेंक्टर आणि ड्रायव्हर यांनी आता टपाचा आधार घेतला असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ही बस उमरखेडवरून पुसदला जात होती. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली आहे. पुलावर पाणी असल्यास वाहतूक करु नये असं सातत्याने आवाहन करण्यात येत असले तरी या एसटी चालकाने अती धाडस करुन ही एसटी पाण्यात घातली आणि हा अपघात घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here