Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांना रास्ता रोको आंदोलनावरुन जोरदार प्रत्युतर

आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांना रास्ता रोको आंदोलनावरुन जोरदार प्रत्युतर

0
आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांना रास्ता रोको आंदोलनावरुन जोरदार प्रत्युतर

अकोले (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

  अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका केली या टिकेचे पडसाद संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे.

किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी रास्ता रोको आंदोलन करत गोपीनाथ पडळकरांनी अकोले तालुक्यात येऊन दाखविण्याची भाषा करत त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धनगरांचे नेते असलेले आमदार पडळकर यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत आमदार पडळकर हे कायम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात त्यामुळे फक्त धनगर समाजच नाही तर संपूर्ण बहुजन समाज आज पडळकारांचा चाहता बनला आहे. पडळकरांचे कार्यकर्ते सोलापूर येथे झालेला त्यांच्यावरील हल्ल्याने आधीच संतापलेले होते त्यातच आज किरण लहामटे यांनी पवारांची मर्जी राखण्यासाठी हा स्टंट केला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील धनगर समाजाचे युवा नेते नवनाथ वावरे यांनी आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांच्या रास्ता रोको आंदोलनाची चांगलीच हवा काढली आहे.

नवनाथ वावरे म्हटले की तुमची स्टंटबाजी म्हणजे शिमग्यात घेतलेले सोंग आहे अशी खरमरीत टिका करत तोंडसुख घेतले आहे. वावरे पुढे म्हणाले की आमदार किरण लहामटे हे दोन महिन्यापासून गप्प मुग गिळुन बसले होते, आज ते केंद्र सरकार व मोदी सरकार वर टिका करतात पण लहामटे यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरसच्या काळात गहू तांदूळ डाळ सर्वसामान्य माणसाला गोरगरीब माणसाला पुर्णपणे मोफत दिला तोच गहू, तांदूळ, डाळ, तुम्ही आदिवासी बांधवाचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुणे, ठाणे व नाशिक या ठिकाणी सतत अठरा महिने विकत होता दोन वेळा ट्रक पकडले गेले पंरतु तुमचे स्वयं घोषीत जाणता राजा  पवार साहेबांचा हात तुमच्या डोक्यावर असल्याने तो गहु तांदूळ तुम्ही सहज पचविला.आदिवासी बांधवाची फसवणुक करुन हे आमदार झाले, रोजगाराचा प्रश्न सोडवणार होते.

एमआयडीसी (MIDC) आणनार होते, आरोग्य सुविधा सुधरवणार होते काय झाले..? याचे उत्तर मतदार संघातील लोकच देतील. सर्व सामान्य कार्यकर्तेवर पोलीस केसेस करणे, जेष्ठ नागरिकांना लाथा बुक्यानी मारणे, कोविड सेंटर वर राजकारण करणे, आकसापोटी कामे करणे हे लोकप्रतीनीधी म्हणून अशोभनीय, कंलकीत आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे अष्टपैलू सर्वसामान्य तळागाळातुन आलेले वंचित, उपेक्षित, अपमानीत,अठरा पगड,बारा बलुतेदार यांचे नेतृत्व करणारे नेते आहे तुमची त्यांच्यावर टिका करण्याची लायकी नाही. तुमची टिका म्हणजे सुर्यावर थुंकण्या सारखे आहे. असा खरपुस समाचार नवनाथ वावरे यांनी घेतला.


 अशोक भांगरे यांनी भाजप पक्ष सोडुन यांचा जार वाळला नाही तेच आज ते केंद्र सरकार वर टिका करतात.पत्नी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्या आहेत आणि आज शरदचंद्र पवारांचे गुणगाण गातात? अशोक भांगरे तुम्ही सुगाव ते शेंडी फक्त दारुचे दुकाने पेरली सर्वसामान्य लोकांना काय मदत केली? दर पंचवार्षिक ला पक्ष बदलुन स्वतः चा विकास साधला. ,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर अर्वाच्य भाषेत बोलण्याची तुमची पात्रता नाही, तुम्ही बोलल्या प्रमाणे आम्ही तुमचे चँलेज स्विकारुन अकोल्यातच नाहीतर तुमच्या दारात शेंडीत घोंगडी बैठक घेऊन दाखवतो. याप्रमाणे वावरे यांनी गर्भित इशारा भांगरे यांना दिला आहे. त्यामुळे भविष्यात भांगरे, लहामटे विरुद्ध नवनाथ वावरे असा नवा संघर्ष बघावयास मिळाला तर नवल वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here