Home महाराष्ट्र मुंबईत करोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी

मुंबईत करोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी

0

मुंबई : देशातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहिमेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. त्यासाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींचा वापर होत आहे. मात्र, जगभरात अजूनही करोनाला  संपवण्यासाठी औषधोपचार आणि लसींचे संशोधन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून झायडसने बनवलेल्या झायकोव्ह-डी लसीची चाचणी देशभरात सुरू आहे. या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे. जे. समूहाच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. लस दिल्याच्या पाच महिन्यांनंतर फक्त २२ लोकांना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की, आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसलेले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींना फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे दिसली आहेत.

या संशोधनाचे नेतृत्व करणारे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, झायकोव्ह-डी  या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो.

एकावेळी दोन्ही हातांना ०.२ मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाते. लस घेतल्यानंतर लोकांना कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारी चाचणी सुरू केली असून या चाचणीत केवळ असेच लोक घेतले गेले ज्यांचा आरटीपीसीआर आणि अँटीबॉडीजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या लस चाचणीचे नुकतेच पाच फॉलोअप पूर्ण केले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here