पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
पुण्यातील भाजपा ओबीसी मोर्चा माजी मुख्य प्रदेश मीडिया प्रमुख सुधाकर राजे यांची (BJP) महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी सुधाकर राजे यांना मुंबईत नियुक्तीपत्र दिले.
सुधाकर राजे यांनी १९९४ साली हवेली तालुका उपाध्यक्ष पदापासून पासून काम केले ते १९९९ – २००० हवेली तालुका अध्यक्ष, २००४ साली पुणे जिल्हा उपाध्यक्ष, २००९ साली किसान मोर्चा अध्यक्ष तेसरचिटणीस, ओबोसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य टे मुख्य मिडिया प्रमुख या पदांवर काम केले आहे तसेच २०१८ पासून नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश मुख्य महामंत्री पदावर काम बघत आहेत.
सुधाकर राजे यांनी नियुक्तीचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, भाजपा कार्यालयात मुख्य प्रभारी रवी जी अनासपुरे, आमदार श्रीकांत जी भरती यांना दिले.
या नियुक्ती बद्दल पुणे शहराचे अध्यक्ष धिरजभाऊ भाऊ घाटे, पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक, पुणे शहराचे माजी अध्यक्ष योगेश दादा गोगावले, पुण्यनगरीचे मा महापौर मुरली अण्णा मोहोळ, माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, आमदार सुनील भाऊ कांबळे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमदार माधवी ताई मिसाळ, माजी प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा विकास अण्णा रासकर, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रोहिदास शेठ उंदरे, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश जी कुटे , महाराष्ट्र प्रदेश कामगाराआघाडीचे विजय जी हरगुडे, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, शिरूर लोकसभा प्रमुख आमदार महेश दादा लांडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे सर, माजी खासदार अमरजी साबळे साहेब, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर शेठ जगताप, मा स्थायी समितीचे अध्यक्ष , पिंपरी चिंचवड महापालिका श्री विलास शेठ मडीगेरी, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी इत्यादींनी अभिनंदन केले.