Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र रावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी

रावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी

0
रावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी

 जळगाव (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या जीनसी गावाजवळ वीज पडून बैलगाडीवरुन जाणारे दहा जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी जीनसी गावातीलच रहीवासी असून एकाच कुटुंबातील आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली?; हायकोर्टाचा सवाल

जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मान्सूनच्या पावासाने हजेरी दिली. रावेर तालुक्यात देखील अनेक भागात आज बुधवारी दुपारी वीजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील जीनसी गावाच्या शेत शिवारात वीज पडली. वीज पडलेल्या ठिकाणाजवळूनच बैलगाडवरुन शेतातून परतत असलेले दहा ग्रामस्थ जखमी झालेत. जखमींना तातडीने रावेर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी भेट देऊन जखमींची विचारपुस केली. १० जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती

जखमींची नावे

१. बळीरामपवार (वय-२१),
२. दिलीप पवार (वय-२१),
३. अरविंद पवार (वय-१५),
४, ईश्वर दल्लू पवार (वय-१५),
५. कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०),
६. अनिल लक्ष्मण पवार (वय-२७),
७. बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०),
८. साईराम मोरसिंग पवार (वय-३७),
९. मलखान मोरसिंग पवार (वय-४५)
१०. लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५)

क्लिक करा आणि वाचा- …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान
क्लिक करा आणि वाचा- राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली?; हायकोर्टाचा सवाल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here