Home महाराष्ट्र जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा…. सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे

जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा…. सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे

0
जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा…. सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात काही दिवसांत इमारतींचे स्लॅब कोसळून १२ जणांचे बळी गेलेत. त्यामुळे महापालिकेने अतिधोकादायक इमारतींवर धडक कारवाई सुरू केली असून १२२ इमारतींचं वीज-पाणी तातडीनं तोडण्याचे आदेश महापालिकेनं दिलेत. या कारवाईने इमारतीमधील रहिवासी धास्तावले आहेत. The government has no money, the government is paying salaries by taking out loans – Jitendra Awhad

धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसोबत चर्चा करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आज उल्हासनगरात आले होते. यावेळी शहरातील रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजनं केले होते. यावेळी इमारतींचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी रहिवाश्यांच्या वतीने करण्यात आली

यावर बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे पैसे नाही सरकार कर्ज घेऊन पगार देत आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा करू नका असे सांगितले, मी सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलो आहे. मी तुमचा मुद्दा नगरविकास मंत्रालयापर्यंत पोहचवेन आणि लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

तसेच निर्वासितांच्या शहरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा विचार करण्याची गरज असून आपल्याला कोणीही बेघर करणारा नाही याची मी हमी देतो असेही आव्हाड पुढे म्हणाले. भारत-पाकिस्तान फाळणी नंतर ज्या शहरात निर्वासित आलेत त्यात ठाणे असो या उल्हासनगर या शहरांच नवं डेव्हलपमेंट मॉडेल बनलं पाहिजे असं मत आव्हाड यांनी आपल्या भाषणात मांडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here