Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पारनेर: पॅरोलवर सुटलेल्या आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले

पारनेर: पॅरोलवर सुटलेल्या आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले

0
पारनेर: पॅरोलवर सुटलेल्या आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील नाराण गव्हाण येथे पॅरोलवर सुटलेल्या आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर यानेच वडीलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्यासह साथिदांराना अटक केली. संग्राम याने शेळके यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यानंतर कपडे बदलून शिरूला गेला. एटीएममधून पैसे काढून पान खाल्ले आणि बदल्याची आग शांत केली. त्याने योजनाबद्ध रित्या शांतपणे हा खून केला असला तरी काही वेळातच पोलिस त्याच्यापर्यंत पोहचले आणि त्याला बेड्या पडल्या. (the mystery of the murder in parner taluka of ahmednagar revealed)

सुमारे अकरा वर्षांपूर्वी राजकीय आणि व्यावासायिक वादातून नारायण गव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने सुपारी देऊन तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहूल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. ती भोगत असताना कोरनामुळे ते पॅरोलवर सुटले आहेत. या काळात शेतात काम करीत असताना राजाराम शेळके याचा खून झाला. पोलिसांसह ग्रामस्थांनीही हा बदल्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्या दृष्टीने तपास सुरू केला. संग्राम कांडेकर हाती लागला आणि घटनेचा उलगडा होत गेला.



असा केला खून

राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम याच्या मनात होती. मात्र शिक्षा झाल्याने शेळके तुरुंगात होता. तो पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची योजना कांडेकर याच्या डोक्यात आली. तीन-चार दिवस पाळत ठेवून त्याने शेळके याच्या दिनचर्येचा आभ्यास केला आणि योजना आखली. शेळके शेतात येत असल्याचे पाहून कांडेकर उसाच्या शेतात लपून बसला. सोबत तलावर घेऊन गेला होता. शेळके एकटा सापडण्याची संधी तो शोधत होता. शुक्रवारी दुपारी शेळके एकटा आल्याचे पाहून कांडेकर याने संधी साधली. पाठीमागून येऊन त्याने शेळकेच्या मानेवर तलवारीने वार केला. त्यामुळे तो खाली पडला. त्यावर कांडेकर याने आणखी वार केला. शेळके गतप्राण झाल्याची खात्री झाल्यावर तो पुन्हा उसाच्या शेतात गेला. येताना त्याने अंगावर दोन टी शर्ट घातले होते. उसाच वरचा शर्ट काढून टाकला. तलवार घेऊन घराजवळ गेला. तेथे डेअरमध्ये तलवार लपवून ठेवली. दुचाकीवरून शिरूरला गेला. तेथे एटीएममधून पाचशे रुपये काढले. पानाच्या टपरीवर जाऊन पान खाल्ले. मग बदलल्याची आग शांत झाली, अशी माहिती त्यानेच पोलिसांना चौकशीत दिली आहे.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. राहूल शेळके याने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गणेश भानुदास शेळके, अक्षय पोपट कांडेकर यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील गणेश शेळके पोलिस दलात वाहनचालक आहे. आरोपींना न्यायालयाने २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here