[ad_1]
हायलाइट्स:
- औरंगाबादमध्ये नव्या बाधितांची संख्या घटून दोन आकडी झाल्याने औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- एकीकडे औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळत आहे, शिवाय दुसरीकडे केंद्रीय पुरातत्व विभागानेही पर्यटनस्थळे, वारसास्थळे बुधवारपासून (१६ जून) सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
- मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यायचा आहे.
औरंगाबादमध्ये नव्या बाधितांची संख्या घटून दोन आकडी झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी ९४ (शहरः २०,ग्रामीणः ७४) नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधित संख्या १,४४,७८८ झाली आहे. तर, २३३ (शहरः १४,ग्रामीणः २०९) बाधित हे करोनामुक्त झाल्याने मुक्तसंख्या १,३९,८४६ झाली आहे. जिल्ह्यात सध्या १५९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा- …तर महापौर आमचा बाप काढतील; आशीष शेलार यांचा टोला
दरम्यान, जिल्ह्यातील सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण करोना बळींची संख्या ३३४९ पर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात लसीकरणाची मोहीम जलदगतीने सुरू असून सोमवारी (१४ जून) १४५७ जणांनी करोना प्रतिबंधासाठी लस घेतली. आज मंगळवारी (१५ जून) ६८ केंद्रांवर महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- भाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू
करोनामुळे दुध विक्री कमी झाली
करोनामुळे दुध विक्री कमी झाल्याचे सांगत जिल्हा दुध संघाने दुध उत्पादक संस्थांना लिटरमागे १७ ते १८ रुपये भाव दिल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केला आहे. हा आरोप करताना गाईच्या दुधास प्रती लिटर ३० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना मागण्याचे निवेदन सादर केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘दोन्ही राजे भाजपच्या मिठाला जागल्यासारखं बोलतात’; खासदार अरविंद सावंत यांचे टीकास्त्र
[ad_2]
Source link