Home महाराष्ट्र परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली

परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली

0

मुंबई  – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. यात दोन डीसीपी, दोन एसीपी आणि एका महिला पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. या सर्वांवर परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.

पोलीस उपायुक्त (डीसीपी) अकबर पठाण, पोलिस उपायुक्त पराग मानारे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक आशा कोंरके अशी बदी करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबतचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्‍त हेमंत नागराळे यांनी नुकतेच जारी केले आहेत.

परमबीर सिंह यांच्यासह इतरांवर मुंबई आणि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह आणि कोपरी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व पाच अधिकाऱ्यांना स्थानिक शस्त्रास्त्र विभागात पाठवले गेले आहे. याला साईड पोस्टिंग विभाग देखील मानले जाते.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व डीसीपी निमित गोयल करणार आहेत.त्यांच्यासमवेत एसआयटीमध्ये एसीपी आणि अन्य पाच निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here