Home महाराष्ट्र twelve bjp mlas suspended: अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला; विधीमंडळ परिसरात भाजपने भरवली प्रतिविधानसभा – maharashtra: bjp mlas start a parallel assembly session outside the house, following a protest against suspension of 12 bjp legislators

twelve bjp mlas suspended: अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला; विधीमंडळ परिसरात भाजपने भरवली प्रतिविधानसभा – maharashtra: bjp mlas start a parallel assembly session outside the house, following a protest against suspension of 12 bjp legislators

0

[ad_1]

मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानं भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने प्रतिविधानसभा भरवत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तसंच, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप करत भाजपनं आज विधिमंडळाबाहेरच अभिरूप विधानसभा भरवली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडला आहे. शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला तर खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केलं जातंय. जे घडलंच नाही. ते घडलं आहे असं सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं जातंय. म्हणून आज या विधानसभेत मी या सरकारच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे,असं फडणवीस म्हणाले.

आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, पण…; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

भाजपने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात तक्रार केली. विधिमंडळ परिसरात स्पीकर, माईक लावायला परवानगी कोणी दिली, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही, असं उत्तर उपाध्यक्षांनी दिलं होतं. सत्ताधारी आमदारांनीही प्रतिविधानसभेवरुन सवाल उपस्थित केले आहेत. त्यानंतर भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून पदावर बसल्यानंतर प्रतिविधानसभेतले माईक, स्पीकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तालिका अध्यक्षांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांकडून प्रतिविधानसभेतील स्पीकर काढून घेण्यात आले.

विधिमंडळ अधिवेशन Live: प्रतिविधानसभेतील स्पीकर, माईक बंद करण्याचे आदेश; विधिमंडळाबाहेर गोंधळ

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here