Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अखेर केडीपाणी जि. प. शाळेस 24 वर्षानंतर मिळाली स्वतःची इमारत

अखेर केडीपाणी जि. प. शाळेस 24 वर्षानंतर मिळाली स्वतःची इमारत

0
अखेर केडीपाणी जि. प. शाळेस 24 वर्षानंतर मिळाली स्वतःची इमारत

शहादा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

जिल्हा परिषद शाळा केवडीपाणी ता.शहादा जि.नंदुरबार स्थापना सन – 1997 आजपर्यंत इमारतविरहीत शाळा होती.गेल्या 24 वर्षापासून शाळाही ग्रामस्थांच्या घरात भरत होती. मा. ॲड. सीमाताई वळवी अध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार, जि. प .सदस्य माननीय रजनीताई नाईक गट कंसाई, माननीय सुरेश दादा नाईक माजी सभापती पंचायत समिती शहादा तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक श्री.प्रकाश मोरे, शिक्षक यांच्या प्रयत्नातून शाळेचे बांधकाम मंजूर झाले.

शाळेचे बांधकाम पाहणीसाठी व अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यासाठीच माननी ॲड.सीमाताई वळवी अध्यक्ष जि.प.नंदुरबार ,माननीय जि.प.सदस्य रजनीताई नाईक गट कंसाई ,माननीय सुरेश दादा नाईक मा .सभापती पंचायत समिती शहादा तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ,माननीय सरपंच प्रभाकर दादा, पंचायत समिती सदस्य यांचे प्रतिनिधी माननीय दिलीप भाऊ व इतर पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोक पाडवी व सदस्य केंद्रप्रमुख श्री.बाविस्कर सर.जि .प .शाळा केवडीपाणीचे मुख्याध्यापक श्री.प्रकाश मोरे सर प्रा.शिक्षक श्री.भगवान गढरी जि.प.शाळा लहान डोजाचे मुख्याध्यापक श्री.भरत फुलपगारे सर ,कंसाई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चौरे आप्पा ,डॉक्टर शेल्टे बांधकाम कमिटीचे सदस्य अशोक पाडवी,केशव पटले,अंबालाल ठाकरे,कुवरसिंग पाडवी,फत्तेसिंग पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here