चोपडा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
चोपडा तालुक्यातील जिल्हा अध्यक्ष योगेश बावीस्कर यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष सुनील सपकाळे यांच्या अध्यक्षते खाली सर्व पदाधिकारी यांची शासकीय विश्राम गृह येथे आढावा घेण्यात आली त्यात 17,11,2023 रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे येथुन मुंबई मंत्रालया वर पायी संघर्ष पद यात्रा निघणार आहे तरी त्या संघर्ष पद यात्रेत कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आणि आदिवासी वाल्मीक लव्य सेना नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
गजानन पुरुषोत्तम शिरसाठ,चोपडा शहर अध्यक्ष, रवींद्र ईश्वर कोळी यांना चोपडा तालुका शहर उप अध्यक्ष, दिपक श्रावण कोळी तालुका उप कार्य अध्यक्ष,प्रविण एकनाथ कोळी तालुका सह संघटक , राजु शालिक कोळी तालुका सदस्य,राजेंद्र वना सोनवणे तालुका सदस्य,तुळशीदास निंबा कोळी शाखा अध्यक्ष, सोपान धनसिंग कोळी शाखा उपअध्यक्ष,अशा नियुक्त्या करण्यात आल्या त्या वेळी जिल्हा उप अध्यक्ष प्रकाश आबा बावीस्कर ,तालुका अध्यक्ष सुनील सपकाळे,उप संपर्क प्रमुख लक्ष्मण बावीस्कर,तालुका सचिव रवींद्र देवराज,सह सचिव उमेश सपकाळे,तालुका संघटक महेंद्र कोळी, आदी समाज बांधव उपस्थित होते.