Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र श्रीमती सुजाता वसंत परदेशी यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव करण्यात आला

श्रीमती सुजाता वसंत परदेशी यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव करण्यात आला

0
श्रीमती सुजाता वसंत परदेशी यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव करण्यात आला

धुळे: कोरोना आजाराच्या वैश्विक संकटाच्या काळात देखील खंबीरपणे रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचा करावा तेवढा सन्मान कमी पडेल. कोरोनाच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देखील जीवाची बाजी लावणाऱ्या परिचारिकांचे कार्य गौरवास्पद आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील लसीकरण विभागाच्या अधिपरिचारिका श्रीमती सुजाता वसंत परदेशी यांचा पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. करोना काळात त्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याने हा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डाॅ.संतोष नवले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, लसीकरण प्रमुख डॉ. अभय शिनकर, डाॅ. स्वप्निल पाटील, डॉ. अन्सारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here