Home महाराष्ट्र 29 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

29 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई – पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 29 जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

उत्तर बंगालच्या खाडीवर चक्रवाताचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणाम उत्तर बंगालची खाडी आणि त्याच्या आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रवातांमुळे 29 जुलैपर्यंत जम्मू-काश्मीर आणि हिमचल प्रदेश, उत्तरांखड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडलण्याचा अंदाज आहे. तर काही भागांमध्ये अधिक जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर याची तीव्रता कमी होईल.

दरम्यान, मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळून, महापूर यामुळे रायगड – 71, रत्नागिरी – 21, सातारा – 41, ठाणे – 12, कोल्हापूर – 7, मुंबई – 4, आणि सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा आणि अकोल्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 56 जण जखमी झाले असून अद्याप 100 जण बेपत्ता आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here