Home महाराष्ट्र नाना पटोले बैठकीत दाखल होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्कादायक कृत्य!

नाना पटोले बैठकीत दाखल होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्कादायक कृत्य!

0
नाना पटोले बैठकीत दाखल होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्कादायक कृत्य!

वाशिम : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

करोनाच्या रुग्णसंखेत सध्या घट झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात निर्बंधांबाबत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा मिळाली असली तरी करोना नियमांचं पालन करण्याचे आदेश कायम आहेत. बैठका घेण्यास मुभा मिळाली असली तरी सामाजिक अंतर कायम ठेवणे गरजेचं आहे. मात्र असं असताना सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला मात्र याचा विसर पडल्याचं चित्र आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे पाहायला मिळाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार होते. या दरम्यान कार्यकर्त्यांची हॉलमध्ये गर्दी जमली होती. तर हे कमी म्हणून की काय कार्यकर्त्यांनी संगीत कार्यक्रमाच्या दरम्यान चक्क पैसेही उधळले.

कॉंग्रेसची कामगिरी आणि पक्षसंघटन याबाबत आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ते आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांची कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतची पहिली आढावा बैठक कारंजा शहरातील एस. के. फंक्शन हॉल इथं ठेवण्यात आली होती. मात्र या ठिकाणी करोनाच्या दृष्टीकोनातून कोणतेच नियम आयोजकांकडून पाळण्यात आले नाहीत. या हॉलमध्ये ६०० ते ८०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आयोजित कार्यक्रमात संगीत मैफलीचाही कार्यक्रम ठेवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हद्दच पार केली आणि संगीत कार्यक्रम सुरु असताना नोटांची उधळण केली गेली.

नाना पटोले हे उशिरा येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी हे सगळं आयोजन करण्यात आले होते. करोनासारख्या महामारीत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असं बेजाबदार वर्तन केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाना पटोले हे या सभागृहात दाखल होताच त्यांना आपल्या वयाच्या वर्षांइतक्या वजनाचा केक दिसला. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तो केक कापून वाढदिवसही साजरा केला. मात्र, गर्दी दिसताच त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. यावेळी नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, आमदार वजाहत मिर्झा, अतुल लोंढे आणि रिसोड मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमित झनक हे उपस्थित होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here