जितक्या लवकर तुम्ही उपचार कराल तितक्या लवकर तुम्हाला आराम मिळू शकेल. डोळा हा अतिशय नाजूक अवयव असल्यामुळे थोडीशी हयगय देखील महागात पडू शकते. म्हणूनच आम्ही येथे काही सामान्य कारणे सांगणार आहोत जी तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम करतात व यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं असतं.
रुमेटाईड आर्थराइटिस होणं
रुमेटाईड आर्थराइटिस एक ऑटोइम्यून सिस्टम आहे ज्यामध्ये आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सांध्यांमधील हेल्दी टेश्यूवर हल्ला करते. याच स्थितीमुळे डोळ्यांत लालसरपणाची लक्षणे दिसून येतात. हे लक्षात ठेवा की रुमेटाईड आर्थराइटिस डोळ्यांमध्ये वाढत नाही पण याच्या होण्याने डोळ्यांची स्थिती बिघडण्याचा धोका अधिक वाढतो. ज्यामुळे डोळ्यांत जळजळ होण्यासोबतच पाणी वाहू शकते. एक थंड शेक संधिवातमुळे होणारी वेदना आणि लालसरपणा दूर करण्यात प्रभावी ठरु शकतो.
कंजक्टिवाइटिसची समस्या
कंजक्टिवाइटिसची लक्षणे बहुतांश वेळा एका डोळ्यातून सुरू होतात पण जस जशी ही स्थिती वाढत जाईल तस तसं त्याचा परिणाम दोन्ही डोळ्यांवर होतो. या समस्येचे उपचार या गोष्टीवर ठरवले जातात की तुम्हाला ही समस्या अॅलर्जीमुळे झाली आहे की व्हायरलमुळे? जर डोळ्यांच्या बुबूळाच्या पुढील भागात होणारा दाह अॅलर्जीमुळे सुरू झाला असेल तर अँटीहिस्टामाइन ड्रॉप्स आणि थंड बर्फाचा किंवा पाण्याचा शेक यावर सर्वोत्तम उपचार ठरु शकतो. हे व्हायरल आणि बॅक्टेरियल अशा दोन्ही रूपात पसरण्याची शक्यता आहे. व्हायरल कंजक्टिवाइटिससाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. पण बॅक्टेरियल कंजक्टिवाइटिस घरगुती उपचार आणि आय ड्रॉप्सद्वारे बरा करता येतो.
कॉन्टॅक्ट लेन्स घालणं
जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घालत असाल तर कधीना कधी तुम्हाला डोळ्यांत पाणी येण्याची आणि चुरचुरण्याची समस्या होई शकते. रात्रीचं कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्यामुळे असे होते. जर आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस जास्त काळ घालून ठेवत असाल तर डोळ्यांत वारंवार पाणी येण्याची समस्या वाढत जाते. जर कॉन्टॅक्ट लेन्समुळे केवळ एका डोळ्यामध्ये लालसरपणा आणि पाणी येण्याची समस्या होत असेल तर लेन्स काढून टाका. पण हे लक्षात ठेवा की आपल्या डोळ्यांमध्ये त्वरित नवीन कॉन्टॅक्ट लेन्स लावू नका. काही दिवस फक्त चष्म्याचा वापर करा.
डोळ्यांत धुळीचे कण किंवा कचरा जाणं
बर्याच वेळा घराची साफसफाई करताना धूळ किंवा वाळूचे कण डोळ्यांत जातात. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ व पाणी येण्याची समस्या उद्भवते. जर एखादा लहान धुळीचा कण डोळ्यांमध्ये गेला असेल तर डोळे कमीत कमी हलवा. तर हा कचरा अश्रूंच्या मदतीने सुद्धा बाहेर काढला जाऊ शकतो. तज्ञांनी सल्ला दिला आहे की डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत.
डोळे कोरडे पडणे
ड्राय आय सिंड्रोम ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये आपल्या डोळ्यांत अश्रू येतच नाहीत. कोरड्या डोळ्यांची लक्षणे बहुतांश वेळा केवळ एका डोळ्यामध्येच दिसून येतात. यावर उपचार करण्यासाठी आर्टिफिशियस अश्रू काही काळ आराम देतात. तज्ञ म्हणतात की जे लोक संगणकावर बर्याच काळासाठी काम करतात, ते खूप कमी वेळा पापण्या उघडझाप करतात. ज्यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या होऊ शकते. जर आपण संगणक किंवा लॅपटॉपसमोर बसून बराच वेळ काम करत असाल तर दर 20 मिनिटांनी आपल्याला लॅपटॉक किंवा संगणकापासून दूर राहून डोळ्यांना विश्रांती देण्याची आवश्यकता आहे.
ऑक्युलर रसिया
Rosacea रोजासिया मध्ये आपल्या त्वचेसोबतच डोळ्यांवर देखील परिणाम होतो. डोळ्यांत सूज येते. ही स्थिती काहीवेळा एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये दिसून येते. आपला खराब आहार, ताणतणाव व दारु पिण्याची सवय रसिया अधिकच धोकादायक बनवू शकतो. यासाठी आपल्या पापण्या वारंवार धुवा, कोमट पाण्याचा शेक द्या. हे उपाय ग्रंथींना आराम देतील आणि सूज देखील कमी करतील.
उन्हामुळे समस्या
आपल्या त्वचे प्रमाणेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपले डोळे देखील खराब होऊ शकतात. जेव्हा हे घडते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या फक्त एकाच डोळ्यावर तर काही प्रकरणांत दोन्ही डोळ्यांवर दिसून येतो. या समस्येचा सामना करण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याचा किंवा बर्फाचा शेक द्या. जर या उपायाचा परिणाम दिसत नसेल तर पेन किलर घेतल्याने बराच आराम मिळेल.
क्लोरिनचं पाणी
क्लोरिनेटेड पाणी हे देखील जळजळ आणि पाणी येणा-या डोळ्यांचे एक कारण आहे. लघवी आणि घाम यांसारखे प्रदूषक एकत्रितपणे क्लोरामाइन्स बनवू शकतात, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. क्लोरीनच्या संपर्कात आल्यानंतर जर आपले डोळे लाल होत असतील तर डोळ्यांवर स्वच्छ आणि थंड पाण्याचा शिडकावा करा. आपल्या डोळ्यातील कॉन्टॅक्ट लेन्ससह पोहणे टाळा. क्लोरीन आणि इतर प्रदूषक आपल्या डोळ्यांपासून दूर ठेवण्यासाठी काळ्या रंगाचा गॉगल किंवा चष्मा घालणे फार महत्वाचे आहे. एका डोळ्यात पाणी येणे आणि जळजळ होणे वेदनादायक असू शकते पण आपण या लक्षणांच्या सामान्य कारणांवर घरीच उपचार करू शकता. जेव्हा घरगुती उपचार काम करत नाहीत तेव्हा नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.