शासननामा न्यूज ऑनलाईन
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिल्पा शेट्टी सगळ्या गोष्टींमध्ये बॅलेन्स आणण्याचा प्रयत्न करताना दिसते.
इतकंच नाही तर ते ती योग्य पद्धतीनं करते. शिल्पाचं लग्न झालं असून तिची आई आणि बहीण देखील आहेत. ते त्यांच्यासोबत अनेकदा स्पॉट होतात. शमिता शेट्टी असं तिच्या बहिणीचं नावं असून ती देखील एक अभिनेत्री आहे. मात्र, शमिताला शिल्पाप्रमाणे प्रेम मिळाले नाही. तिनं तिच्या करिअरमध्ये फक्त 9 चित्रपट केले, तर त्यातील अनेक चित्रपट हे फ्लॉप झाले. शमिता शिल्पाप्रमाणे चर्चेत असते. पण तिचं चर्चेत असण्याचं कारण हे नेहमी तिचं खासगी आयुष्य आहे. शमिता आजही अविवाहित आहे. त्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया…
शमितानं चाळीशी ओलांडली तरी सुद्धा ती अविवाहीत का आहे? असं नाही की शमिता कधी रिलेशनशिपमध्ये नव्हती. ‘बिग बॉस 15’ मध्ये एन्ट्री केल्यानंतर ती अभिनेता राकेश बापटसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. ते ‘बिग बॉस 15’ मधून बाहेर आल्यानंतर देखील ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर शमिता कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आली नाही. या आधी देखील शमिता रिलेशनशिपमध्ये होती मात्र, तिचं कोणतंही नातं जास्त काळ टिकलं नाही.
शमिताचं नाव आजवर कोणासोबत जोडण्यात आले? हे जाणून घेऊया…
शमिता शेट्टीचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडण्यात आले होते. त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं आहेत. रिपोर्ट्सनुसार, मनोज बाजपेयी यांच्यासोबत जोडले होते. मनोजसोबत लग्न करू न शकल्यानं शमितानं आजपर्यंत कोणाशीही लग्न केलं नाही. त्याशिवाय शमिताचं नाव हे हरमन बावेजासोबतही जोडण्यात आलं होतं. त्यानंतर उदय चोप्रासोबतही जोडण्यात आले. त्यानंतरही शमिताला तिच्यासाठी एकही परफेक्ट व्यक्ती सापडला नाही. अजूनही तिला एकही परफेक्ट अशी व्यक्ती मिळाली नाही. इतकंच नाही तर शमिताला तिच्या घरच्यांनी कधी लग्न कर असं म्हणत दबाव टाकला नाही. त्यामुळे तिला जेव्हा वाटेल आणि जेव्हा तिला योग्य वर मिळेल तेव्हा ती लग्न करणार आहे.