Home महाराष्ट्र ED On Raj Kundra: चार माफीचे साक्षीदार? ईडीचेही लक्ष; कुंद्राच्या अडचणीत वाढ

ED On Raj Kundra: चार माफीचे साक्षीदार? ईडीचेही लक्ष; कुंद्राच्या अडचणीत वाढ

0

मुंबई – उद्योगपती राज कुंद्राच्या मालकीच्या विआन इंडस्ट्रिजमधील चार कर्मचाऱ्यांनी माफीचे साक्षिदार होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

त्यातच त्याच्या अंधेरी येथील कार्यालयात चार छुपी कपाटे सापडली. त्यात सापडलेल्या माहितीचा तपशील अद्याप समजू शकला नाही.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती असणाऱ्या राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक करण्यात आली होती. त्याला 27 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

काही कर्मचाऱ्यांचे कुंद्रा यांच्यांशी मतभेद झाली असल्याची शक्‍यता असून त्यांना कुंद्रा यांच्या समोरच प्रश्‍न विचारले जातील त्यातून कुंद्रा यांच्याबाबत आणखी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज कुंद्रा प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर राज कुंद्राच्या अंधेरीमधील विआन आणि जे. एल. स्टिम या दोन उद्योगांच्या अंधेरीतील कार्यालयावर छापे टाकले. त्यावेळी त्याच्या कार्यालयात चार छुपी कपाटे असल्याचे आढळले आहेत.

दरम्यान, परकीय चलन नियामक कायद्याअंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर खटला दाखल केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकरणात अंमलबाजावणी संचनालय (ईडी) तपास करण्याची शक्‍यता आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here