Home महाराष्ट्र काळजी घ्या! राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर पुन्हा पावसाचे सावट

काळजी घ्या! राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर पुन्हा पावसाचे सावट

0

मुंबई : राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ  घातला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह  अनेक जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची शक्यता वर्तवली आहे.  यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने पूराचे पाणी ओसरत असून, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आज  आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार असून, २९ आणि ३० जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंट अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here