वेबसिरीज वर नियंत्रण आणण्यासाठी कायदा बनवा – खासदार डॉ. विकास महात्मे यांची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचेकडे मागणी

0
35


 
नवी दिल्ली (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यसभेचे खासदार आणि पद्मश्री पुरस्कृत  नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मा. जावडेकरां ची भेट घेतली.  त्यांच्यासमवेत श्री चंद्रशेखर पाल, रवींद्र  पाल आणि जीतू बघेल हे होते. कोविडमुळे, मंत्र्यांनी अधिक लोकांना भेटण्यास असमर्थता दर्शविली होती.

मा. जावडेकर जी यांच्याशी चर्चा झालेले मुद्दे असे-

१. एकता कपूर द्वारा  निर्मित व्हर्जिन भास्कर या अश्लील वेब सिरीज मध्ये  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या झालेल्या अपमानामुळे मा. मंत्री तप्त झाले. अहिल्याबाईं ची बदनामी करणारे दृष्य काढले नाही तर संपूर्ण सिरीज वरच प्रतिबंध आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२. या लज्जास्पद घटनेच्या अनुषंगाने एका  अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. आजकाल वेब सीरिजमध्ये अश्लीलता, लैंगिक दृश्ये , शिवीगाळ, अमली  पदार्थाचे व व्यसनाचे समर्थन किंवा महान व्यक्तींचा अपमान होत असल्याचे निदर्शनास येते. म्हणून वेब सिरीज वर नियंत्रण असण्यासाठी सेन्सॉर बोर्ड किंवा कायदा असावा अशी मागणी खासदार डॉ. महात्मे यांनी केली.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी यास सहमती दर्शवत लवकरच हा कायदा आणण्याचे  आश्वासन दिले. मंत्र्यांची  सकारात्मक भूमिका प्रशंसनीय आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे समाजात बदल घडून येईल ज्यामुळे आपली युवा पिढी भरकटणार नाही. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here