खर्चासाठी पैसे देत नसल्याने तरुणाकडून वृद्ध आईला मारहाण; गुन्हा दाखल

0
19
 मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

वृद्ध आईची जबाबदारी झटकणाऱ्या एका तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपली ६७ वर्षीय आई खर्चासाठी पैसे देत नसल्याने हा तरुण तिला मारहाण करत होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. भादंविच्या इतर कलामांबरोबरच ज्येष्‍ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्‍याण अधिनियम, २००७ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर नगर परिसरात सबिना (बदललेले नाव) या सुमारे ४५ वर्षांपासून राहतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलाला आणि मुलीचे संगोपन केले. २२ वर्षीय मुलगी आणि ३० वर्षांच्या मुलासोबत त्या राहातात. घरोघरी जाऊन घरकाम करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा काहीच कामधंदा करीत नाही. त्याला अनेक व्यसने असून ती पूर्ण करण्यासाठी तो आईकडे वारंवार पैसे मागत असे. पैसे न दिल्यास त्याने अनेकदा आईला मारहाणदेखील केली. राहती खोली विकून मला पैसे दे अशी मागणीही तो अनेक दिवसांपासून करत होता.

सबिना यांनी अनेकदा त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पैसे दिले नाहीस तर मी तुला सांभाळणार नाही अशी धमकी देऊन निघून गेला. अखेर सबिना यांनी शिवाजीनगर नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Source link