[ad_1]
खाण्यामध्ये मुलं अनेक पर्याय शोधू लागतात. मग अशावेळी मुलांना काय खायला द्यावं हा प्रश्न आईला पडतो. यावर एक उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता. यामुळे तुमची मुलं देखील आनंदाने प्रत्येक पदार्थांचं सहजपणे सेवन करतील. म्हणूनच आम्ही तुम्हाला १८ महिन्यांच्या मुलांचं आठवड्याभराचं डाएट प्लॅन सांगणार आहोत. ज्यामुळे मुलांची उंची आणि वजन वाढीला देखील मदत मिळू शकते.
१८ महिन्यांच्या मुलांंनी किती खावं?
मुलांनी किती आणि कोणते खाद्यपदार्थ खावेत हे त्यांच्या वयावर आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतं. मुलांना तुम्ही वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवून देत असाल तर ते आवडीने खातात. मात्र सतत एकच पदार्थाचं सेवन करणं त्यांच्यासाठी कंटाळवाणं होऊन जातं. १८ महिन्यांची मुलं या वयात पहिल्यापेक्षा फार कमी खातात. म्हणूनच त्यांना १.२ किलो कॅलरीची आवशक्यता असते. यासाठी मुलांना किती प्रमाणात तुम्ही प्रत्येक पदार्थ खायला देत आहात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
सोमवारचं डाएट चार्ट
सोमवारी सकाळी नाश्तामध्ये मुलांना दुधाबरोबर टोस्ट द्या. त्यानंतर थोड्यावेळाने उकडलेला बटाटा स्मॅश करून द्या. दुपारी जेवणामध्ये देखील मुलांना तुम्ही विविध खाद्यपदार्थ देऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये डाळ, चपाती, मुलांच्या आवडीची भाजी, काकडीचे काही तुकडे, अगदी कमी भात तुम्ही मुलांना देऊ शकता. तसेच संध्याकाळी स्ट्रॉबेरी योगर्ट द्या. यामुळे मुलांच्या तोंडाची चव देखील बदलेल. त्यानंतर रात्री जेवणामध्ये मुग स्प्राउट्स, ओट्सचे कटलेट द्या. पौष्टिक खाद्यपदार्थांमुळे मुलांंची शारीरिक वाढ अधिक चांगल्या रितीने होते.
(प्रेग्नेंसीनंतर वेट लॉसदरम्यान महिला करतात ‘या’ मोठ्या चूका, अति घाई आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक)
मंगळवारी द्या पौष्टिक पदार्थ
मंगळवारी सकाळी नाश्तासाठी बेसन पिठाचा ढोकळा आणि केळ्याचे मिल्क शेक द्या. त्यानंतर थोड्या वेळाने एक ग्लास कलिंगडाचे ज्यूस मुलांना द्या. दुपारच्या जेवणामध्ये पालक पनीरची भाजी आणि पराठा तुम्ही देऊ शकता. संध्याकाळी मुलांना भूक लागली असेल तर शेवयांची खीर करून द्या. तसेच रात्रीच्या जेवणासाठी मिक्स भाजी आणि पनीर पराठा मुलांना द्या. यामुळे मुलांच्या तोंडाची चव बदलेल. आणि मुलं प्रत्येक पदार्थ आवडीने खातील.
बुधवारी द्या ‘हे’ पदार्थ
बुधवारी सकाळी मुलांना नाश्तामध्ये बदाम आणि खजूरचे मिल्क शेक द्या. त्यानंतर मुलांना चिक्की खायला द्या. बहुतांश मुलं चिक्की हा पदार्थ आवडीने खातात. दुपारच्या जेवणामध्ये मिक्स धान्याची चपाती, डाळ, भाजी आणि उकडलेल्या बटाट्याचे काही तुकडे, थोडा भात मुलांना द्या. संध्याकाळी मुलांना फ्रुट कस्टर्ड खायला द्या. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारी आणि बेसनच्या पिठापासून तयार करण्यात येणारा पोळा, दही मुलांना द्या. त्याचबरोबरीने एखादं पौष्टिक सूप देखील तुम्ही मुलांना देऊ शकता.
(मास्क न घालता देखील सुरक्षित राहू शकतात मुलं, फक्त ‘ही’ १ गोष्ट ठेवा कायम लक्षात!)
गुरुवारचं जेवण
या दिवशी सकाळी नाश्तामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची घालून पोहे तयार करा. आणि ते मुलांना द्या. याबरोबरच चॉकलेट आणि आक्रोडचं मिल्क शेक देखील तुम्ही मुलांंना देऊ शकता. त्यानंतर थोड्या वेळाने सोया, गहूपासून तयार करण्यात आलेली गुळ पापडी मुलांना द्या. दुपारच्या जेवणामध्ये चपाती, डाळ, भाजी, काकडीचे काही तुकडे, थोड्या प्रमाणात भात द्या. संध्याकाळी काहीतरी वेगळं मुलांनी खावं म्हणून मिल्क कस्टर्ड किंवा अंड्याच्या कस्टर्डचं पुडिंग मुलांना द्या. तसेच रात्री जेवणामध्ये राजमा, भात आणि टोमॅटोचं सूप द्या.
(डिलिव्हरीनंतर झटपट वेट लॉससाठी नाश्तामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश, काही दिवसांमध्येच व्हाल स्लिम)
शुक्रवारी मुलांना काय द्यावं?
शुक्रवारी मुलांना नाश्तामध्ये एक अंड किंवा हिरव्या चटणीबरोबर पनीर पराठा द्या. थोड्या वेळानंतर पपईवर मध टाकून तुम्ही मुलांना देऊ शकता. दुपारी जेवणामध्ये मुलांना भात, चपाती, डाळ, भाजी, भात द्या. संध्याकाळी मुलांना शेवयांची खीर करून द्या. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये पनीर कटलेट, मासे मुलांन द्या. मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीराला पोषक घटकांची गरज अधिक भासते. अशावेळी मुलांच्या डाएटची काळजी आपणच घेतली पाहिजे.
(१ वर्षाच्या मुलांना आठवडाभर द्या ‘हे’ खास खाद्यपदार्थ, उंची व वजन वाढीला लागणार नाही ब्रेक)
शनिवारचं जेवण
या दिवशी नाश्तामध्ये मुलांना शेवची चटणी तसेच चिकूचे मिल्क शेक द्या. मिल्क शेक मुलं अगदी आवडीने आणि कंटाळा न करत पितात. थोड्या वेळानंतर मुलांना केळ खायला द्या. दुपारच्या जेवणामध्ये गव्हाची चपाती, मसुरची डाळ, पालक आणि टोमॅटोची भाजी मुलांना खायला द्या. संध्याकाळी मुलांना सफरचंद आणि खजूरचे मिल्क शेक द्या. रात्री जेवणासाठी पुलावबरोबर टोमॅटोचे सूप मुलांना द्या. मुलांचा शारीरिक विकास हा पौष्टिक पदार्थांवर देखील अवलंबून असतो.
(करोना काळात मुलांची इम्युनिटी व हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर नक्की बनवा ‘ही’ आरोग्यवर्धक रेसिपी!)
रविवारचं डाएट प्लॅन
रविवारी सकाळी नाश्तासाठी मुलांना अंड्याची पोळी किंवा पनीरचे लाडू द्या. याबरोबरच अंजीर मिल्क शेकही तुम्ही मुलांना देऊ शकता. नाश्ताच्या थोड्या वेळानंतर पपई मुलांना भरवा. तसेच दुपारच्या जेवणामध्ये चपाती, डाळ, भाजी, भात आणि काकडी द्या. संध्याकाळी घरगुती बटाट्याचे चिप्स, टोमॅटोची चटणी आणि दूध मुलांना द्या. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये नाचणीचा डोसा, बटाट्याची भाजी आणि सांभार मुलांना द्या. पण हे डाएट फॉलो करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा आवश्य सल्ला घ्या.
(बाळाचे केस जाड व लांब हवे असतील तर प्रत्येक आईने फॉलो कराव्यात ‘या’ सोप्या टिप्स)
[ad_2]
Source link