Home मनोरंजन Aamir Khan Kiran Rao Divorce News And Reason: जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?

Aamir Khan Kiran Rao Divorce News And Reason: जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?

0
Aamir Khan Kiran Rao Divorce News And Reason: जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?

[ad_1]

प्रेमाच्या नात्याचे लग्नामध्ये रूपांतर करून बरीच वर्षे एकत्र राहणारे जोडपे देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतात. नेमके असे काय घडतं, ज्यामुळे दोन व्यक्ती विभक्त होण्याचा निर्णय घेतात? असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात डोकावतो. लग्नाला इतके वर्ष उलटल्यानंतर एखादे कपल जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेतात, तेव्हा आणखी आश्चर्य वाटते. याबाबत तुम्ही काहीही म्हणा, पण नातेसंबंध संपुष्टात येण्यासाठी नक्कीच काहीतरी कारण असतेच.

पती-पत्नी स्वत:च्या इच्छेनुसार विभक्त होण्याचा निर्णय घेत नाहीत, पण यामागे असंख्य मुख्य कारणे असू शकतात. ज्यामुळे त्याचं नाते अपयशी ठरत असावे. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. पण हीच बाब कित्येक विवाहित जोडप्यांमध्ये घडत असल्याचे आढळते. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​’किरणपासून वेगळे होऊ शकत नाही’

एका मुलाखतीदरम्यान आमिरने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित कित्येक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानं म्हटलं होतं की, पहिली पत्नी रीना दत्तापासून विभक्त झाल्यानंतर मी वाईटरित्या कोलमडलो होतो. यानंतर किरण रावसोबत भेट झाली. दोघांनी २००५मध्ये लग्न केलं. काही वर्षानंतर अभिनेत्याने आपल्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव करत म्हटलं होतं की, ‘किरणशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि लाभलेल्या या आयुष्याबाबत मी आभार व्यक्त करतो. ती एक अद्भुत व्यक्ती आहे आणि किरण माझ्या आयुष्यात असल्याने मी भाग्यवान असल्याचे समजतो’.

आमिरने खानप्रमाणेच असे कित्येक लोक आहेत, जे आपला जोडीदार परफेक्ट असल्याचे सांगूनही विभक्त होण्याचा निर्णय घेताना आढळतात. प्रेमात पडणे आणि कधीही वेगळे न होण्याचे वचन देऊनही विवाहित जोडपे अखेर विभक्त होण्याचा निर्णय का घेतात? वर्षानुवर्षे एकत्र राहूनही नातेसंबंध टिकून का राहत नाहीत? याबाबत काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)

​विश्वास कमी होणे

एखादे नाते टिकवण्यासाठी जितके प्रेम आवश्यक असते, तितकेच त्यामध्ये विश्वास असणं सुद्धा महत्त्वाचे असते. तुमचा आपल्या जोडीदारावर विश्वास नसणे म्हणजे नात्यात नक्कीच काहीतरी चूक घडतं आहे. नातेसंबंधात काही वर्षांपर्यंत दोन व्यक्ती पूर्णपणे एकमेकांवर विश्वास ठेवतात, पण हळूहळू नात्यात गैरसमज पसरण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत आपण जोडीदारावर संशय घेण्यास सुरुवात करता, त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवू लागता. यामुळे तुमच्या जोडीदारास त्रास होतो. येथूनच नातेसंबंध कमकुवत होण्यास सुरुवात होते.

तसंच जर आपण जोडीदाराशी छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वारंवार खोटं बोलत आहात आणि नंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली, तर तुमच्या नात्याचा पाया ढासळण्याची शक्यता आहे. कारण काहीही असो पण जोडीदाराकडून एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नात्यात शंका निर्माण होण्यासारखेच आहे. अशाप्रकारेच तुमच्या नात्यातील विश्वास कमी होऊ लागतो आणि एक दिवस विश्वास पूर्णपणे संपतो.

(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​वादविवाद – भांडणे वाढणे

दोन व्यक्तींमध्ये प्रेम असल्यास किरकोळ स्वरुपात वाद होणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा भांडणे अति प्रमाणात होऊ लागतात, तेव्हा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. यादरम्यान काळ खूप वेगाने पुढे सरकत असतो, पण स्वतःला सांभाळणे देखील आवश्यक असते. कालांतराने आपण स्वतःमध्ये कितीही बदल केले तरी नात्यात योग्य ते बदल घडवून आणणं शक्य होत नाही. नात्याच्या सुरुवातीस कपल एकमेकांचे सारं काही समजून घेण्यास तयार असतात, पण जसजसे वर्षे सरत जातात तसतसे तुमच्या व जोडीदारामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ लागतात.

(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)

​दुरावा निर्माण होतो

पार्टनरला दिवसभरातील सर्व घडामोडी सांगण्याची तुमची सवय असते, दुसरीकडे वादविवादांदरम्यान रागाच्या भरात त्याच्या/तिच्या विरोधात काहीही वाईट म्हटलं जातं. वारंवार वाढणाऱ्या भांडणाांमुळे जोडप्यामध्ये दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण आता एकत्रित राहू शकत नाहीत, असेही जोडप्याला वाटू लागते. यानंतर ही मंडळ विभक्त होण्याचा निर्णय घेतात. पण कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो, हे तुम्ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीचे विचार तुमच्या विचारांपेक्षा वेगळे असू शकतात. विचार वेगवेगळे असल्यास एकत्रित बसून समस्या सोडवणे हा उत्तम पर्याय आहे.

(‘अक्षयला ती आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती’ रेखाबद्दल रवीनाचे विधान! जाणून घ्या दोघांत तिसरा व्यक्ती कसा येतो?)

​दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणे

दोन व्यक्तींमध्ये खूप प्रेम असतानाही ही मंडळी काही वर्षांनंतर दुसऱ्या जोडीदाराची निवड करतात, कित्येक नातेसंबंधांमध्ये ही गोष्ट आढळते. कधी-कधी यामागील कारण नात्यात भावनिक ओढ कमी होत असल्याचे दिसते. एका अभ्यासातील माहितीनुसार, जेव्हा जोडप्यांमधील संवाद कमी होऊ लागतो, तेव्हा ते एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. म्हणूनच भावनिक आधार मिळवण्यासाठी लोक सहसा दुसर्‍या व्यक्तीकडे आकर्षित होतात.

म्हणूनच दोन व्यक्तींमध्ये तिसऱ्याची एण्ट्री कधी होते, हे कळतही नाही. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर जोडप्यांना त्यांच्या नात्यात नेहमीच नावीन्य टिकवून ठेवणं गरजेचं आहे.

दुसरीकडे बऱ्याचदा काही लोकांना ठराविक काळानंतर नात्यामध्ये कंटाळा येत असल्याचंही आढळते. अशा लोकांपासून आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीसोबत नातेसंबंध जोडण्यापूर्वी त्याच्या/तिच्याबाबत ऑफिस किंवा मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा इतिहास जाणून घेणे गरजेचं आहे.

(‘रिलेशनशिप नव्हे, मैत्री आहे’ आलियाने रणबीरसोबतच्या नात्याबाबत सांगितली ही गोष्ट, जाणून घ्या फायद्याची माहिती)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here