Home मनोरंजन aamir khan on falling in love with kiran rao: ‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याबाबत गंभीर झालो’ आमिरवर असा होता किरण रावचा प्रभाव

aamir khan on falling in love with kiran rao: ‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याबाबत गंभीर झालो’ आमिरवर असा होता किरण रावचा प्रभाव

0
aamir khan on falling in love with kiran rao: ‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याबाबत गंभीर झालो’ आमिरवर असा होता किरण रावचा प्रभाव

[ad_1]

एखादे नाते टिकवण्यासाठी प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. पण रिलेशनशिपसाठी इतकंच पुरेसे नाही, हे देखील तितकेच खरे आहे. आताच्या युगात बऱ्याच गोष्टी बदलल्याचं पाहायला मिळत आहे, जीवनात तुमची प्राधान्ये फक्त प्रेमापुरते मर्यादित राहत नाहीत. आपण कित्येक लोकांना भेटता आणि ते तुम्हाला आवडू लागतात. पण तुम्हाला त्यांच्यासोबत अख्खं आयुष्य एकत्रित घालावायचे आहे का? हे समजणे तितके सोपे नाही.

प्रेमानंतर आपले नाते पुढे नेण्याबाबत बहुतांश लोकांमध्ये गोंधळ पाहायला मिळतो. यामागील कारणे असंख्य असू शकतात. भूतकाळातील अनुभवांमुळे काही लोकांच्या मनामध्ये भीती असते अथवा नेमका कसा जोडीदार हवाय याबाबत आपण संभ्रमित असू शकता. पण दोन व्यक्ती एकत्र राहू लागल्यानंतर मनातील हा गोंधळ दूर होतो. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतही (Aamir Khan) झालं होतं. याबाबत त्यानं स्वतः माहिती शेअर केली होती. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​‘मी नात्याकडे गांभीर्यानं पाहू लागलो’

आमिर खानने एका मुलाखतीदरम्यान आपल्या वैवाहिक जीवनातील कित्येक सीक्रेट सांगितले होते. आमिरने सांगितलं की, ‘किरणचा माझ्यावर सकारात्मक प्रभाव होता. यामुळे ‘Live In Relationship’दरम्यान मी नात्याकडे गांभीर्याने पाहू लागलो. मी तिला एकत्र राहण्यास सांगितले तेव्हा मला काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. अन्यथा मी हे पाउल उचलले नसते. लग्नापूर्वी जवळपास दीड वर्ष आम्ही एकत्र राहिलो’.

केवळ आमिरच नव्हे तर किरणने सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता. जोपर्यंत आमिरसोबत एकत्र राहत नव्हते, तोपर्यंत मी त्याचा गांभीर्याने विचार केला नव्हता. एकत्र राहिल्यानंतर त्यांना एकमेकांमध्ये काही साम्य असल्याचं जाणवले. केवळ आमिरच नव्हे तर असे कित्येक लोक आहेत, ज्यांना आपल्या नात्याबाबत अजिबात खात्री नसते.

(‘मी त्याच्याशिवाय तासभरही जगू शकत नाही’ करीनाच्या ‘या’ शब्दांमध्ये तैमूरसाठी दडलंय अतूट प्रेम)

​एकत्र राहिल्यानं वाढते जवळीक

आमिर आणि किरणप्रमाणेच कित्येक लोकांना प्रेमाची जाणीव इतक्या सहजासहजी होत नाही. अशा परिस्थितीत ही मंडळी घाईने विभक्त होण्याचा निर्णय घेतात. ज्यानंतर कित्येकदा पश्चाताप सुद्धा व्यक्त केला जातो. कोणतेही नाते एखाद्या परफेक्ट डेटच्या तुलनेत केव्हाही अधिक महत्त्वाचे असते, हे तुम्हाला समजणे गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही? कित्येक भेटीनंतरही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. तुम्ही एकत्र राहू लागल्यानंतर एकमेकांच्या गोष्टी, स्वभाव, सवयी समजण्यास मदत मिळते.

(‘दीया और बाती हम’च्या संध्या बींदणीने उद्योगपतीशी का केलं लग्न, बहुतांश तरुणींच्या मनात असेच असतात विचार)

​केवळ प्रेमच पुरेसे नाही

केवळ प्रेमच नव्हे तर दोन व्यक्तींनी एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांना स्वीकारणे देखील गरजेचं आहे. प्रेम असलेल्या व्यक्तीसोबत तुम्ही एकत्र राहता आणि यादरम्यान आपण लगेचच लग्नाचा निर्णय घेता, त्यावेळेस घाईने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. धकाधकीच्या जीवनात नातेसंबंध सांभाळणे दोन्ही व्यक्तींवर अवलंबून असते. दरम्यान एकमेकांचा स्वभाव नीट न समजल्यास नात्यात लग्नानंतर समस्या उद्भवू शकतात. म्हणून हल्लीच्या काळात लोक लग्न करण्यापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात.

(‘अक्षयला ती आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती’ रेखाबद्दल रवीनाचे विधान! जाणून घ्या दोघांत तिसरा व्यक्ती कसा येतो?)

​लग्नाचा निर्णय घाईघाईने घेणे योग्य नव्हे

प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर काही जण लग्न करण्याचा निर्णय घेतात, भलेही त्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव नसते. लग्नासारख्या नात्यासाठी आपण तयार नव्हतो, हे जेव्हा जोडप्याला समजते; तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. काही जण आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक करतात. अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेतल्यानंतरच लग्न करणं शहाणपणाचा निर्णय ठरेल.

(‘रिलेशनशिप नव्हे, मैत्री आहे’ आलियाने रणबीरसोबतच्या नात्याबाबत सांगितली ही गोष्ट, जाणून घ्या फायद्याची माहिती)

​नात्यात संवाद असणे गरजेचं

कोणतंही नाते पुढे न्यायाचं असेल तर दोन व्यक्तींमध्ये संवाद असणं गरजेचं आहे. संवाद नसेल तर नात्यामध्ये गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता अधिक असते. हे नुकसान टाळण्यासाठी व प्रेम वाढवण्यासाठी जोडप्यानं मनमोकळेपणाने संभाषण करणं गरजेचं आहे.

(‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख! नात्यात तुम्हीही या चुका करताय?)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here