Home मनोरंजन मलायका अरोराची बहिणी छोटा ड्रेस घालून पोहोचली पार्टीमध्ये, बोल्ड व हॉट लुक पाहून नेटकऱ्यांनी म्हटलं…

मलायका अरोराची बहिणी छोटा ड्रेस घालून पोहोचली पार्टीमध्ये, बोल्ड व हॉट लुक पाहून नेटकऱ्यांनी म्हटलं…

0
मलायका अरोराची बहिणी छोटा ड्रेस घालून पोहोचली पार्टीमध्ये, बोल्ड व हॉट लुक पाहून नेटकऱ्यांनी म्हटलं…

​कपड्यांमुळे उडवण्यात आली होती खिल्ली

मलायका, करीना आणि अमृता यांचा खास मित्र रितेश सिधवानीनं २०१८मध्ये ख्रिसमस पार्टीचे आयोजन केलं होतं. अमृता अरोरा या पार्टीमध्ये डिझाइनर ड्रेस परिधान करून पोहोचली होती. तिचा लुक प्रचंड स्टायलिश होता. पण अमृताचे या लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिला लगेचच ट्रोल करण्यास सुरुवात केली.

काही लोकांना अमृताने घातलेला ड्रेस ख्रिसमस ट्रीसारखा वाटत होता तर काहींनी अमृताचा अवतार पाहून म्हटलं की,’ सर्व वृद्धांना काय झाले आहे?’ इतकंच नव्हे तर काही लोकांनी अमृताने सजावटीचा खर्च वाचवल्याचे म्हणत तिची खिल्लीही उडवली. तसंच ‘तुझ्या ड्रेसच्या पॅटर्नला नेमकं काय म्हणतात?’ असाही प्रश्न एकाने विचारला.

​कपडे होते चित्र-विचित्र

अमृता अरोराने सीक्विन्ड फॅब्रिकचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. हॉल्टर नेकलाइन डिझाइन असणाऱ्या या आउटफिटचा लुक शायनीयर होता. आउटफिटचे पॅटर्न मेटॅलिक सिल्व्हर होते, ज्यावर चमकदार शेड्समधील डिझाइन आपण पाहू शकता. हेमलाइनमुळे ड्रेसला एसिमिट्रिकल लुक मिळत आहे, यावरही रंगीबेरंगी सीक्विन्स रफल्स डिझाइन जोडण्यात आले आहेत. दरम्यान अमृताच्या कपड्यांमध्ये वाईट असं काहीच नव्हते. पण लेअर कॉम्बिनेशनमुळे आउटफिटचे डिझाइन प्रचंड भडक वाटत आहे.

​अमृताने असा केला होता मेकअप

अमृताने या ड्रेसवर बोल्ड-स्मोकी आईज, डार्क आयशॅडो, बीमिंग हाइलाइटर, मेट रेड लिपस्टिक मेकअप आणि सॉफ कर्ल्स हेअरस्टाइल केली होती. ड्रेसवर तिनं Christian Louboutin डिझाइन केलेले हील्स मॅच केले होते. पण शायनीयर फिनिशिंग असणाऱ्या या आउटफिटमध्ये अमृताचं स्टायलिंग पूर्णतः विचित्र असल्याचं दिसतंय. तसंच ड्रेसमधील रफल्स डिझाइनमुळेही लुक चित्र-विचित्र दिसत आहे.

​का करण्यात आलं ट्रोल?

चमकदार रंगसंगतीमधील आउटफिट परिधान केल्यास स्टायलिंगवर विशेष लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचा लुक पूर्णतः बिघडण्याची शक्यता असते. याचीच झलक आपण अमृताच्या या फोटोद्वारे पाहू शकता. भडक स्टाइल केल्यानं तिचा लुक बोरिंग वाटत होता.

अभिनेत्रीचे हे आउटफिट पार्टी थीमनुसार असू शकते, पण कपड्यांनुसार स्टायलिंग न केल्याने नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या लुकवर थेट नापसंती दर्शवल्याचे पाहायला मिळालं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here